Bhandara Accident Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News: दुचाकीवरील ताबा सुटला, थेट तलावात पडली, तरुणाचा दुर्दैवी अंत; भंडाऱ्यातील घटना

Bhandara latest News: तलावाशेजारी नागरिकांची घरे आहेत. नागरिक मदतीसाठी धावून आले. पाण्यात बुडालेली दुचाकी काढण्यात आली. ज्ञानेश्वरचा शोध स्थानिक नागरिकांनी घेतला. परंतु त्यांना यश आले नाही.

Gangappa Pujari

शुभम देशमुख, भंडारा

Bhandara Accident News: भंडाऱ्यामधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट तलावात कोसळल्याची घटना भंडाऱ्याच्या देव्हाडी येथे घडली. यामध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्ञानेश्वर खराबे (२७, परसवाडा, देव्हाडी) असे मृताचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भंडारा जिल्ह्याील देव्हाडी येथे स्वगावी जाताना दुचाकी अनियंत्रित होऊन दुचाकीसह तरुण तलावात कोसळला. ही घटना देव्हाडी येथील टिळक वॉर्डातील हनुमान तलावात दघडली. हा तलाव रस्त्याच्या अगदी शेजारी आहे. पोलिस प्रशासनाने तलावातून दुचाकी काढली. तर सायंकाळी उशिरा तरुणाचा मृतदेह आढळला. ज्ञानेश्वर खराबे (२७, परसवाडा, देव्हाडी) असे मृताचे नाव आहे.

तलावाच्या काठावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.ज्ञानेश्वर हा दुचाकी वरून परसवाडा येथे स्वगावी जात होता. अचानक भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन तो दुचाकीसह तुडुंब भरलेल्या तलावात कोसळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. तलावाशेजारी नागरिकांची घरे आहेत. नागरिक मदतीसाठी धावून आले. पाण्यात बुडालेली दुचाकी काढण्यात आली. ज्ञानेश्वरचा शोध स्थानिक नागरिकांनी घेतला. परंतु त्यांना यश आले नाही.

दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गोताखोरांना पाचारण केले. घटनास्थळी तुमसरचे पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर व पोलिसांचे पथक शोध मोहीम राबवत आहेत. ज्ञानेश्वरची दुचाकी अनियंत्रित कशी झाली? रस्त्यावरून थेट तलावात तो कसा कोसळला? याचा तपास पोलिस करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: जागावाटपात शिंदेंची तडजोड नाही? सर्व्हेविरोधात एल्गार? दिल्लीवारीतून जागांचा तिढा सुटणार?

Sanjiv Khanna: संजीव खन्ना असतील देशाचे पुढील सरन्यायाधीश, 11 नोव्हेंबरला स्वीकारणार पदभार

Ramtek Assembly Constituency : रामटेकवरुन महाविकास आघाडीत रामायण? ठाकरेंकडून उमेदवारी,काँग्रेसच्या हालचाली, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: न्यायमूर्ती संजीव खन्ना होणार भारताचे सरन्यायाधीश, 11 नोव्हेंबर रोजी घेतील शपथ

Congress First Candidate List : काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; देवेंद्र फडणवीसांविरोधात शिलेदार उतरवला, वाचा लिस्ट

SCROLL FOR NEXT