Bhandara Accident Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Accident : डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू; दुचाकी घसरल्याने झाला घात, सुदैवाने पतीसह दोन मुले बचावले

Bhandara News : तुमसर तालुक्यातील चिखला येथील ओमेश्वर कडू हा पत्नी मीना व दोन मुलांना घेऊन मोटारसायकलने तिरोडा तालुक्यातील सरांडी येथून आपल्या स्वगावी जाण्यासाठी निघाले होते.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: पती- पत्नीसह दोन मुलांना घेऊन चिखला येथे जात असताना गाडी स्लीप झाल्याने दुचाकीस्वार खाली कोसळले. यात पती व दोन मुले रस्त्याच्या बाजूला तर पत्नी रस्त्यावर कोसळली. याच दरम्यान मार्गावरून जाणाऱ्या एसटी बसच्या मागील चाकाखाली आली. डोक्यावरून चाक गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. भंडारा जिल्ह्यातील सिहोरा जवळील वाहनी येथे सदरचा अपघात घडला. 

भंडारा जिल्ह्यातील चिखला येथील मीना ओमेश्वर कडू (वय ३२) असे अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. तुमसर तालुक्यातील सिहोरा जवळील वाहनी येथे अपघात घडला. तुमसर तालुक्यातील चिखला येथील ओमेश्वर कडू हा पत्नी मीना व दोन मुलांना घेऊन मोटारसायकलने तिरोडा तालुक्यातील सरांडी येथून आपल्या स्वगावी जाण्यासाठी निघाले होते. मात्र घरी पोहचण्यापूर्वीच नियतीने घात  केला. 

शेणावरून चाक गेल्याने दुचाकी स्लिप 

गावाकडे जात असतांना वाहनी येथील पाण्याच्या टाकीजवळ सिहोराकडून जाणारी एसटी बस समोरून येताना दिसली. यामुळे दुचाकीस्वार ओमेश्वर कडू याने मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात मोटारसायकलचे चाक रस्त्यावर पडलेल्या शेणावरुन गेल्याने मोटारसायकल स्लीप झाली. त्यामुळे ओमेश्वर कडू व दोन मुले हे रस्त्याच्या डाव्या बाजूला फेकले गेले. तर पत्नी मीना ही रस्त्यावर पडली. 

सुदैवाने मुले बचावली 

महिला खाली पडताच समोरून आलेल्या एसटीचे चाक डोक्यावरून गेल्याने अक्षरशः डोक्याचा चेंदामेंदा होऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने या अपघातात पतीसह दोन्ही मुले सुदैवाने बचावले. अपघाताची माहिती सिहोरा पोलिसांना समजताच ठाणेदार विजय कसोधन पथकासह घटनास्थळी आले. पोलिसांनी पंचनामा करत घटनेची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT