Tumsar Accident saam tv
महाराष्ट्र

Tumsar Accident : भरधाव ट्रकने महिलेला चिरडले; तुमसर बसस्थानक परिसरातील घटना

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे आज दुपारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. तुमसर बसस्थानक परिसरात नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. येथून जाणाऱ्या मार्गावरून भरधाव वेगाने वाहने धावत असतात

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील तुमसर बसस्थानक परिसरात एका भरधाव ट्रकने महिलेला चिरडल्याची घटना घडली. हा अपघात इतका भयानक होता, की घटनास्थळीच अपघात ग्रस्त महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी ट्रक चालकाला चांगलाच चोप दिला. यामुळे परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. तसेच अपघातानंतर वाहतूक देखील खोळंबली होती. 

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे आज दुपारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. कौशल्या रूदुर दहाट असे अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. तुमसर बसस्थानक परिसरात नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. असे असताना देखील येथून जाणाऱ्या मार्गावरून भरधाव वेगाने वाहने धावत असतात. अशाच भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने महिलेला धडक दिली. यात तिचा मृत्यू झाला. परिसरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वाहनांच्या माध्यमातून अवैध वाहतूक होत असते. मात्र प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसून येत असल्याच्या संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. 

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील बसला आग 

मावळ : मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर किलोमीटर ४३ या ठिकाणी पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका खाजगी बसला अचानक आग लागली. धावत्या बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. मात्र आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही अथवा कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. 

सुदैवाने जीवितहानी टळली 

पुण्याच्या दिशेने जात असलेल्या खासगी बसला अचानक आग लागली. बसला आग लागल्याची माहिती समजतात आयआरबी कंपनी व खोपोली नगरपरिषद यांचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. यानंतर आग विझवण्यात यश मिळाले. तोपर्यंत मात्र या दुर्घटनेमध्ये बस पूर्णतः जळून खाक झाली होती. या घटनेमुळे पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. तर सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

SCROLL FOR NEXT