मयुरेश कडव
बदलापूर : बदलापुरामध्ये एका महिलेने आपल्यावर नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावून अत्याचार झाल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासात धक्कादायक सत्य समोर आले असून मेव्हण्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी उल्हासनगरातील एका वकिलाने हा सगळा कट रचल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र कट रचणारा वकील आणि अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करणारी महिला फरार आहेत.
उल्हासनगरातील वकीलाच्या पत्नीने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. मात्र आपल्या पत्नीला भाऊ अभिषेक याची फूस असल्याचा संशय वकील सन्नी याला होता. त्यामुळे वकिलाने अभिषेक याला अत्याचाराच्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला. त्यानुसार उल्हासनगरातील एका महिलेला त्याने कटात सामील करून घेत संपूर्ण प्लॅन आखला होता.
दरम्यान या प्रकरणात प्रथमेश नामक तरुणाने अभिषेकच्या नावाने स्नॅपचॅट अकाऊंट उघडत त्यावरून संबंधित महिलेशी चॅटिंग करण्यास सुरवात केली. तसेच नोकरीच्या मुलाखतीसाठी बदलापूरच्या लॉजवर येण्यास सांगितलं. कटात सहभागी असणारी महिला तिथे आल्यानंतर तिने थेट बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात जात अभिषेकने आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी अभिषेकचा शोध घेतला. मात्र चौकशी दरम्यान लॉजमध्ये महिलेसोबत गेलेली व्यक्ती अभिषेक नसल्याचे पोलिस तपासात निदर्शनास आलं.
वकील व महिला फरार
पोलिसांनी अभिषेकच्या नावाने लॉजमध्ये गेलेल्या भावेश याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. या दरम्यान त्याने हा सगळा कट अभिषेक याच्या बहिणीचा पती वकील सन्नी याने रचल्याची कबुली दिली. पोलिसांनी कटात सहभागी असलेल्या भावेश आणि प्रथमेश या दोघांना अटक केली आहे. मात्र वकील सन्नी आणि बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करणारी महिला हे दोघेही फरार झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.