Dhule Fraud Case : एमएसईबी अधिकारी असल्याची बतावणी करत लाखोंचा गंडा; धुळे सायबर पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात

Dhule News : कुटुंबातील सदस्याच्या ऑपरेशनसाठी तातडीने ८ लाख रुपये पाठवण्याची विनंती केली त्यावर विश्वास ठेवून समोरच्या सांगण्यावरून संबंधित व्यक्तीने तात्काळ आरटीजीएसद्वारे पैसे पाठवले
Dhule Fraud Case
Dhule Fraud CaseSaam tv
Published On

धुळे : एमएसईबीचे अधिकारी असल्याचे भासवत लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार धुळ्यात समोर आला. फसवणूक करणाऱ्या तिघा आरोपींच्या धुळे सायबर विभागाच्या पोलिसांनी गुजरात येथील सुरत येथून मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. 

विज वितरण कंपनीच्या धुळे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या नावाने एका ग्राहकाला फोन केला. फोनवरील व्यक्तीने स्वत:ला एमएसईबीचे अधिकारी असल्याचे सांगत कुटुंबातील सदस्याच्या ऑपरेशनसाठी तातडीने ८ लाख रुपये पाठवण्याची संबंधीतांना विनंती केली. अधिकारी बोलत असल्याने त्यावर विश्वास ठेवून समोरच्या सांगण्यावरून संबंधित व्यक्तीने तात्काळ आरटीजीएसद्वारे पैसे पाठवले. 

Dhule Fraud Case
Ulhasnagar Crime : फेसबुकच्या मैत्रीतून साधली जवळीक; ब्लॅकमेल करून लग्न, नंतर घडले ते भयंकर

फसवणूक झाल्याचे समजताच पोलिसात तक्रार 

पैसे ट्रान्सफर केल्यानंतर संबंधिताने केलेल्या फोन नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण सदरचा व्यक्ती फोन उचलत नसल्याने अखेर एमएसईबीच्या कार्यकारी अभियंत्यांनाच या संदर्भात फोनवरून माहिती दिली. मात्र महावितरणच्या धुळे कार्यालयाचे कार्यकारी अभियंत्यांनी असा कुठलाही फोन झाला नसल्याचे संबंधितास सांगितले. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे संबंधितास लक्षात आले. यानंतर त्याने पोलिसात तक्रार केली. 

Dhule Fraud Case
Latur Crime : सख्खे भाऊ बनले पक्के वैरी; शेतीच्या वादातून तीन भावांनी केला बाप- लेकाचा खून

तिघांना सुरत येथून घेतले ताब्यात 

संबंधित व्यक्तीची फसवणूक झाली असल्याचे निदर्शनास आले असता या संदर्भात धुळे सायबर पोलिसांनी याचा सखोल तपास करत फसवणूक करणाऱ्यांचा शोध लावला. या प्रकरणातील तिघेजण सुरत (गुजरात) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांचे पथक सुरत येथे पोहचून तिघांना ताब्यात घेण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील करवाई सायबर पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com