Ulhasnagar Crime : फेसबुकच्या मैत्रीतून साधली जवळीक; ब्लॅकमेल करून लग्न, नंतर घडले ते भयंकर

Ulhasnagar News : ब्लॅकमेल करत तिच्या मनाविरुद्ध तरुणाने लग्न केलं. मात्र लग्नानंतरही तरुणीचा छळ करण्यास सुरवात केली. माहेरून पैसे आणि विविध वस्तू आणण्यासाठी पतीसह सासरच्यांनी छळायला सुरुवात केली
Ulhasnagar Crime
Ulhasnagar CrimeSaam tv
Published On

उल्हासनगर : एका तरुणीची फेसबुकवर एका तरुणासोबत ओळख झाली. या ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि प्रेमात झालं. या मैत्रीदरम्यान तरुणाने दोघांच्या काही क्षणांचे फोटो आणि चित्रीकरण केले. यानंतर तरुणीला ब्लॅकमेल करून तिच्याशी लग्न केलं. लग्न केल्यानंतर माहेरुन पैसे आणण्यासाठी तरुणीला अक्षरशः सिगारेटचे चटके दिल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून पतीविरोधात बलात्काराचा तर सासरच्या मंडळींविरोधात शारीरिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणीची काही वर्षांपूर्वी फेसबुकवर एका तरुणाशी ओळख झाली. या ओळखीतून दोघांमध्ये चांगल्यापैकी मैत्री झाली. कालांतराने मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांच्या गाठीभेटीही वाढल्या. याचा दरम्यान दोघांमधील काही क्षणांचे प्रियकराने मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं आणि तो व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरवात केली. 

Ulhasnagar Crime
Pimpri Chinchwad Crime : मित्रांच्या मदतीने एकावर जीवघेणा हल्ला; लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच्या रागातून घटना

ब्लॅकमेल करत केले लग्न 

ब्लॅकमेल करत तिच्या मनाविरुद्ध तरुणाने लग्न केलं. मात्र लग्नानंतरही काही सुरळीत सुरु न ठेवता तरुणीचा छळ करण्यास सुरवात केली. तिला माहेरून पैसे आणि विविध वस्तू आणण्यासाठी पतीसह सासरच्यांनी छळायला सुरुवात केली. काही वेळा माहेरच्यांनी या मागण्या पूर्ण देखील केल्या. मात्र त्यामुळे सासरच्या मंडळींची हाव आणखीन वाढली. त्यातूनच अक्षरशः तिला सिगारेटचे चटके देखील देण्यात आले होते. अखेर हा सगळा छळ असह्य झाल्याने या तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. 

Ulhasnagar Crime
Chinchani Village : दोनशे लोकवस्तीच्या गावात एक कोटीची उलाढाल; वर्षभरात चिंचणीला २५ हजार पर्यटक दाखल

कोर्टाच्या आदेशानंतर प[पोलिसात गुन्हा दाखल 

मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न करून घेतल्यामुळे तिने न्यायालयात खासगी केस दाखल केली. न्यायालयाने या प्रकरणात पती आणि सासरच्या मंडळींविरोधात बलात्कार, मारहाण आणि शारीरिक छळाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानंतर मात्र विठ्ठलवाडी पोलिसांनी या तरुणीचा गुन्हा दाखल करून घेतला. तसेच तिच्या पतीला देखील पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारामुळे उल्हासनगर शहरात मोठी खळबळ उडाली असून दुसरीकडे तरुणीने दाखवलेल्या या धाडसाचं कौतुक होतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com