Nandurbar : मत्स्यव्यवसाय सुरु करत शेतकऱ्यांनाही बनविले सक्षम; नंदुरबारच्या तरुणाचा राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्याच्या भवरे या संपूर्ण आदिवासी वस्ती असलेल्या गावात राहणाऱ्या योहान गावित यांनी आठ वर्षांपूर्वी आपल्या पारंपरिक शेतीसोबत मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला.
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदूरबार : नवापूर तालुक्यातील भवरे या आदिवासी वस्तीतील शेतकरी योहान अरविंद गावित यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर प्रेरणा दिली आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत त्यांनी पिंजऱ्यातील मत्स्य व्यवसायातून असामान्य यश प्राप्त केले आहे. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेण्यात आली असून भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्ली येथे गावित यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

नंदुरबार जिल्ह्याच्या भवरे या संपूर्ण आदिवासी वस्ती असलेल्या गावात राहणाऱ्या योहान गावित यांनी आठ वर्षांपूर्वी आपल्या पारंपरिक शेतीसोबत मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला. मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत शासनाकडून ६० टक्के अनुदान मिळवले. या योजनेतून त्यांना १८ पिंजरे उभारण्यासाठी सुमारे ३२ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले. योहान गावित यांनी या आर्थिक सहाय्याचा उपयोग करत गावातील तलावात अत्याधुनिक पद्धतीने मत्स्यपालन सुरू केले.

Nandurbar News
Dhule Fraud Case : एमएसईबी अधिकारी असल्याची बतावणी करत लाखोंचा गंडा; धुळे सायबर पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात

व्यवसायातून शेतकऱ्यांनाही बनविले सक्षम 
योहान गावित यांनी मत्स्यपालन व्यवसायाला फक्त आर्थिक उपजीविकेपुरते मर्यादित ठेवले नाही. तर या व्यवसायातून इतर शेतकऱ्यांनाही सक्षम बनवले. त्यांनी आपल्या पिंजऱ्यांमध्ये मत्स्यबीज तयार करून ते शेतकऱ्यांना पुरवले. याशिवाय, मत्स्यपालनासाठी लागणारे साहित्य पुरवून शेतकऱ्यांच्या व्यवसायिक गरजा भागवल्या. आज त्यांच्या या कामामुळे भवरे गाव व परिसरातील अनेक शेतकरी मत्स्य व्यवसायाकडे वळले असून आपली आर्थिक स्थिती सुधारत आहेत. 

Nandurbar News
Badlapur Crime : मेहुण्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवलं, ती महिला 'गायब'; वकील भावोजीचा असा झाला पर्दाफाश

गावातील तरुणही वळले मत्सव्यवसायाकडे 
योहान गावित यांच्या कर्तृत्वाचा आदर्श घेत जलसाठा असलेल्या इतर गावांतील तरुणही मत्स्यपालनाकडे वळत आहेत. भवरे गावातून सुरू झालेली ही प्रेरणा आता जिल्हा, राज्याची सिमा ओलांडून देशातील इतर भागांपर्यंत पोहोचली आहे. योहान गावित यांच्या कामगिरीमुळे शेतीसोबत जोडव्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाच्या योजनांचा प्रभावी उपयोग करता येते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 

केंद्र शासनाकडून दखल 

योहान गावित यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा महाराष्ट्रातच नव्हे तर केंद्र शासन स्तरावरही झाली. महाराष्ट्र राज्याचे सहआयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग यांनी त्यांच्या प्रकल्पाची पाहणी करून केंद्र शासनाला प्रकल्पाचा अहवाल सादर केला. यानुसार, केंद्र शासनाने त्यांची निवड करून प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानासाठी त्यांना निमंत्रित केले आहे. नुकतेच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांनीही या प्रकल्पाला भेट देवून योहान गावित यांचे कौतुक केले होते.

राष्ट्रपतींच्या सन्मानाचे आमंत्रण 
भारतीय पोस्ट विभागाचे निरीक्षक भरत चौधरी आणि पोस्टमॅन सुनिल गावित यांनी राष्ट्रपतींच्या सन्मानाचे औपचारिक आमंत्रण योहान गावित यांना सुपुर्द केले. हे आमंत्रण स्वीकारताना योहान गावित आणि त्यांच्या पत्नी यशोदा गावित यांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. आमच्यासाठी फक्त सन्मान नाही, तर आमच्या गावासाठीही अभिमानाची गोष्ट आहे. शासनाच्या अनुदानाचा योग्य वापर करून व्यवसाय उभारता येतो आणि कुटुंबाचा आर्थिक विकास साधता येतो; हे सिद्ध झाल्याचे गावित यांनी सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com