Bhandara Accident Saamtv
महाराष्ट्र

Bhandara Accident: भरधाव कारची दुचाकीला धडक, सुट्टीवर आलेल्या जवानासह तिघांचा मृत्यू; गावावर शोककळा

Bhandara Speecing Car Accident: भरधाव कारच्या धडकेत जवानासह तिघांचा जागीच मृत्यू; अपघातातील मृत जवानावर स्वगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Gangappa Pujari

शुभम देशमुख, प्रतिनिधी

Bhandara Accident News:

भंडारा शहरातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अनियंत्रित कारने दुचाकीला धडक दिल्याने सैनिकासह तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रामटेक महामार्गावरील खुर्शीपार येथे घडली आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अनियंत्रित कारने समोरुन येणाऱ्या दोन दुचाकीस दिलेल्या धड़केत दुचाकीवरील तिघांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना भंडारा शहरालगत असलेल्या रामटेक महामार्गावरील खुर्शीपार येथे घडली. मृतांमध्ये एका भारतीय सैन्यातील जवानाचाही समावेश असून सुट्टीनिमित्त तो नुकताच गावी आला होता.

नागेश्वर बालपांडे असे या जवानाचे नाव असून तो सातोना गावचा रहिवासी आहे. काही कामानिमित्त तो भंडाऱ्याकडे गेला होता. यावेळी गावाकडे माघारी येताना त्याच्या गाडीला एका अनियंत्रित कारने जोरदार धडक दिली.

या धडकेत दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील मृत जवानावर स्वगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्देवी घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

कन्नड नगरपरिषदेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना; थरारक VIDEO

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

SCROLL FOR NEXT