Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara : शाळेत जाताना विद्यार्थिनीवर काळाची झडप; चिखलात सायकल स्लिप होताच ट्रॅक्टरची धडक, विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

Bhandara News : नियमित सायकलने शाळेत जात असताना रस्ता देखील चांगल्या पद्धतीने माहिती असताना रस्त्यावरील चिखलामुळे मुलीला जीव गमवावा लागला आहे. यात सोबत असलेल्या चार मैत्रिणी थोडक्यात बचावल्या आहेत

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: रोजप्रमाणे शाळेत जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीवर काळाने झडप घातली आहे. पावसामुळे रस्त्यावर झालेल्या चिखलात सायकल स्लिप झाली. यामुळे खाली पडताच ट्रॅक्टरने धडक दिली. यात मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडाऱ्याच्या बाम्हणी येथे घडली आहे. तर तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणी थोडक्यात बचावल्या आहेत. 

भंडारा जिल्ह्यातील बाम्हणी येथे सदरची घटना आज सकाळी घडली. सिमरन श्याम ठवकर (वय १५) असे अपघातात मृत झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. दरम्यान सिमरन हि रोज सकाळी सायकलने शाळेत जात असायची. त्यानुसार आज देखील सकाळी ती चार मैत्रिणीसोबत सायकलवरून शाळेकडे निघाली होती. पण, काही अंतरावर गेल्यानंतर नियतीने घात केला आणि सिमरनला जीव गमवावा लागला आहे. 

रस्त्यावरील चिखलाने झाला घात 

दरम्यान पाऊस झाल्यामुळे रस्त्यांवर चिखल झाला आहे. रस्त्यावरील चिखलामुळे सिमरनची सायकल स्लीप झाली आणि ती खाली कोसळली. याच वेळी समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागचा लोखंडी भाग सिमरनच्या डोक्याला लागला. यामुळे डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सोबतच्या इतर मैत्रिणी थोडक्यात बचावल्या. हा हृदयद्रावक अपघात बाम्हणी रस्त्यावर घडला. 

मुलाचा वाढदिवस साजरा करून पित्याची आत्महत्या
शिरपूर : रात्री मुलाचा वाढदिवस आनंदात साजरा केलेल्या पित्याने पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना दहिवद (ता. शिरपूर) येथे घडली. गोरख गणपतराव सूर्यवंशी (वय ४९, रा. दहिवद) असे मृताचे नाव आहे. गोरख सूर्यवंशी गावातील श्री दोधेश्वर शैक्षणिक संस्थेत लिपिक म्हणून सेवारत होते. पहाटे साडेपाचला राहत्या घराच्या जिन्याजवळ मोकळ्या जागेत लोखंडी कडीला दोराने गळफास लावलेला त्यांचा मृतदेह आढळला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Royal Enfield Hunter 350 आणि Ronin कोणती बाईक आहे दमदार? जाणून घ्या फिचर्स अन् किंमती

Chandrashekhar Bawankule: मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दुय्यम निबंधक कार्यालयात धाड; अधिकाऱ्याच्या ड्रॅावरमध्ये सापडले पैशांचे बंडल|VIDEO

Maharashtra Live News Update : - नंदुरबारच्या जिल्हा परिषद विद्यार्थ्यांचा मोठा दिलदारपणा

Mumbai To Grushneshwar: मुंबईहून घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी प्रवास कसा करायचा? जाणून घ्या रेल्वे, बस आणि सर्वोत्तम पर्याय

Nandurbar : खाऊच्या पैशांनी पूराग्रस्तांना मदत; जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यांचा पुढाकार, घरोघरी जाऊन मागितला निधी

SCROLL FOR NEXT