Bhandara Accident Saam Tv
महाराष्ट्र

Accident: भंडाऱ्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची दुचाकीला धडक, आजोबा आणि नातीचा दुर्दैवी मृत्यू

Bhandara Accident: भंडाऱ्यामध्ये भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये आजोबा आणि नातीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणाचा तपास भंडारा पोलिस करत आहेत.

Priya More

Summary -

  • भंडाऱ्यात भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने आजोबा आणि नातीचा मृत्यू.

  • चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला.

  • येवल्यात ट्रक आणि कारच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू.

  • पोलिस तपास सुरू असून स्थानिकांनी जखमींना मदत केली.

शुभम देशमुख, भंडारा

भंडाऱ्यामध्ये हिट अँड रनची घटना घडली. भीषण रस्ते अपघातामध्ये आजोबा आणि नातीचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर एलोरा शिवारात ही घटना घडली. भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये आजोबा आणि नात दोघेही गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भंडाऱ्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण दमाहे (६५ वर्षे) आणि त्यांची नात आयुषी दमाहे (१९ वर्षे) या दोघांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. लक्ष्मण दमाहे, त्यांची पत्नी फुलाबाई आणि नात आयुषी हे दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या कारने जोरदार धडक दिली होती. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. कारची धडक इतकी जबरदस्त होती ही दोघेही रस्त्यावर जोरात फेकले गेले. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.

तर, येवल्यामध्ये भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला. नाशिक-संभाजीनगर महामार्गावर येवल्याच्या गवंडगाव शिवरात मध्यरात्रीच्या सुमारास मालवाहू ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. सरला स्वप्निल लांडगे असे मृत महिलेचे नाव आहे. पुढे जात असलेल्या ट्रकला पाठीमागून येत असलेल्या कारने जोरात धडक दिली. या अपघातामध्ये महिलेचा मृत्यू झाला तर आणखी एक जण गंभीर जखमी झाला. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येवला पोलिस अपघाताचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठीची मुदत पुन्हा वाढवली! शेवटचा दिवस कोणता?

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी, बांगलादेशाने आयात बंदी हटवली

Banana Mask: केसांच्या वाढीसाठी 'असा' करा केळीच्या सालीचा वापर, वाचा हेअर मास्क बनवण्याची सोपी पद्धत

Voter List Scam : हा तर मोठा घोटाळा! मतदार यादीत एकाच महिलेचं ६३ वेळा नाव; कुठे झाला घोळ?

Mumbai Dabbawala: डबेवाल्यांना मुंबईत मिळणार ५०० स्क्वेअर फुटाचं घर

SCROLL FOR NEXT