विचित्र अपघात, ऑटोला दुचाकी धडकली, महामार्गावर पडलेल्या दोघांना कारने चिरडलं Saam Tv (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

Bhandara Accident : विचित्र अपघात, ऑटोला दुचाकी धडकली, महामार्गावर पडलेल्या दोघांना कारने चिरडलं

Bhandara Highway Accident : भंडाऱ्यातील साकोली येथे दुचाकी व ऑटोच्या धडकेनंतर महामार्गावर पडलेल्या दोघांना डस्टर कारने चिरडले. या अपघातात दोघांचा मृत्यू. पोलिसांकडून तपास सुरू.

Namdeo Kumbhar

शुभम देशमुख, भंडारा प्रतिनिधी

Bhandara Sakoli Road Accident : भंडाऱ्यातील साकोली येथे विचित्र अपघात झालाय. दुचाकीला ऑटोनं जोरदार धडक दिली, त्यामुळे दोघे महामार्गावर पडले. त्या दोघांना डस्टर कारने जोरात धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या विचित्र अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.

भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर उकारा फाट्याजवळ हा विचित्र अपघात झाला. मृतक गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील यादवराव गोपालराव वघारे (वय ३६, रा. आमगाव) आणि जितेंद्र रवींद्र उपराडे (वय २८, रा. मोहनटोला) हे दोघे मोटरसायकलवर (क्र. एमएच ३५/एएम ०६७०) नागपूरकडे रोजगाराच्या शोधात निघाले होते. पण त्याआधीच काळाने घाला घातला. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोच्या चालकाने प्रवाशांना महामार्गालगत उतरवून अचानक वाहन वळवले. यावेळी मागून येणाऱ्या मोटरसायकलची ऑटोला जोरदार धडक बसली. त्यामुळे दोन्ही तरूम रस्त्यावर फेकले गेले. त्याचवेळी मागून भरधाव येणाऱ्या डस्टर कारने (क्र. एमएच ०४/जीजे ४३१८) दोघांना चिरडले. कारचालक अशोक भैय्यालाल काळसर्पे (रा. कवळी टोला, गोरेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या अपघातात यादवराव यांचा जागीच मृत्यू झाला, तर जितेंद्र उपराडे कारखाली अडकून काही अंतर रेंगाळत गेला. त्याला गंभीर अवस्थेत साकोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यालाही मृत घोषित केले.

अपघाताची माहिती मिळताच साकोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम, वाहतूक शाखेचे निरीक्षक जितेंद्र बोरकर आणि ठाणेदार महादेव आचरेकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वुडुले, संदीप भगत आणि महेश नेताम करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT