शुभम देशमुख, भंडारा प्रतिनिधी
भंडाऱ्यात मुंबई - कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. बोलोरो कार आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला. भंडाऱ्यातील बेला येथे रविवारी रात्री अपघात झाला. अपघातानंतर महामारगावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रूग्णालयात दाखल केले, तर मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलेय.
बेला येथे बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात मुंबई - कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा शहराजवळील बेला इथं रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडला. रायपूरकडून आलेलं बोलेरो वाहन हे नागपूरकडं जात होते. यात ५ जण प्रवास करीत होते.
बेला गावाजवळ असलेल्या हॉटेल साई प्रसादमध्ये हे सर्व जेवण करण्यासाठी महामार्गावरून वळत असताना नागपूरकडून भरधाव आलेल्या ट्रकवर आदळले. यात चौघांचा मृत्यू झाला. तर, चालक गंभीर जखमी आहे. घटनेनंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबली. घटनेची माहिती मिळतात भंडारा पोलीस आणि गडेगाव महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवलं. तर, अपघातग्रस्त वाहनांना महामार्गावरून हटवून वाहतूक पूर्ववत सुरू केली.
मृतकांची नावं
१) शिलेंद्र बघेल
२) शैलेश गोकुळपुरे
३) विनोद बिनेवार
४) अशोक धैरवाल
जखमी
१) अविनाश नागतोडे
खामगावमध्ये भरधाव कार दुभाजकाला धडकल्याने अपघात, दोन जण गंभीर जखमी
भरधाव वेगाने जात असलेली कार दुभाजकाला धडकल्याने मोठा अपघात झाला आहे, यामध्ये दोन जण गंभीरित्या जखमी झाल्याची घटना बुलढाण्याच्या खामगाव अकोला रोडवरील वरखेड फाट्याजवळ घडली आहे, स्थानिकांनी तात्काळ अपघात स्थळी धाव घेत कार मध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले, सुदैवाने या मोठ्या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही, कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.