Pandharpur, Bhagwat Karad saam tv
महाराष्ट्र

Do You Think Inflation Is High In India ? भारतातील महागाईबाबत भागवत कराड यांचा जावईशोध, म्हणाले...

राज्यात सत्तांतर होईल हे महाविकास आघाडीचे स्वप्न राहिल असा टोलाही भागवत कराड यांनी लगावला.

भारत नागणे

Dr. Bhagwat Karad News : इतर विकसनशील देशांच्या तुलनेत भारतात अजूनही महागाई कमी आहे असा जावई शोध केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी लावला आहे. चलनी नोटांवर गणपतीचे चित्र छापा हे गुजरात निवडणूकीसाठी केजरीवाल यांची नौटंकी सुरू आहे. चलनी नोटांवर कोणत्याही दैवतांची चित्रे छापली जाणार नसल्याचेही अर्थ राज्यमंत्र्यांनी पंढरपुरात (pandharpur) स्पष्ट केले. (Bhagwat Karad Latest Marathi News)

डॉक्टर भागवत कराड आज (शनिवार) विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी भागवत कराड यांचा पंढरपूर अर्बन बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य कमी असल्याचे मान्य केले. (Maharashtra News)

ज्या इंग्लंडने भारतावर दीडशे वर्ष राज्य केले त्या इंग्लंडमध्ये महागाईचा उच्चांक आहे (Do You Think Inflation Is High In India ?) काही विकसनशील देशांपेक्षा भारतात मात्र महागाई कमी असल्याचे डॉक्टर कराड यांनी स्पष्ट केले. इतर देशांपेक्षा रुपयाचे मूल्य चांगले आहे. पण डॉलरच्या तुलनेत रूपया घसरतोय हे नक्की , पण सध्या रूपया ४५ पैशांनी वाढ झाली आहे. (Breaking Marathi News)

राज्यात सध्या शिंदे- फडणवीस यांचे डबल इंजिन सरकार असल्याने विकासासाठी निधी कमी पडणार नाही. पंढरपूर - फलटण रेल्वेसाठी ही निधी उपलब्ध करून दिली जाईल. राज्यात सत्तांतर होईल हे महाविकास आघाडीचे दिवा स्वप्न राहिल असा टोलाही भागवत कराड यांनी लगावला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ठराव पास, तटकरेंची महत्वाची भूमिका; सूनेत्रा पवारांना कोणती मोठी जबाबदारी मिळाली?

Bombil Fry Recipe: कोकणची अस्सल चव, कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी

Royal Enfield Classic 350: किराण्याच्या बजेटमध्ये दारी येईन Royal Enfield,जाणून घ्या EMIचे गणित

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार! २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT