Best Agricultural State Award to Maharashtra 
महाराष्ट्र

Best Agricultural State Award: महाराष्ट्राला 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य' पुरस्कार; दिल्लीत होणार पुरस्काराचे वितरण

Bharat Jadhav

माजी सरन्यायाधीश, केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी. सथाशिवम यांच्यासह 15 जणांच्या अध्यक्षतेखालील कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्र राज्याला 2024 सालचा 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य' पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. येत्या 11 जुलै रोजी दिल्लीतील हॉटेल हॉलिडे इन मध्ये 15 व्या 'एग्रीकल्चर लीडरशिप कोन्क्लेव्ह'मध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार असून राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. एग्रीकल्चर टुडेच्या वतीने या पुरस्काराची सुरुवात 2008 सालापासून करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र शासनाने मागील वर्षात पर्यावरणाच्या संरक्षणासह अन्नसुरक्षा, सर्वात मोठी बांबू लागवड, तृणधान्य अभियान, औष्णिक वीज निर्मितीत बायोमास चा वापर यांसारखे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असून 1.7 दशलक्ष हेक्टर क्षेत्राचे 123 मेगा सिंचन प्रकल्प, पंतप्रधान किसान सन्मान निधी दुप्पट करणारे देशातील पहिले राज्य, त्याचबरोबर 4.63 लाख शेतकऱ्यांना नॅनो युरिया व नॅनो डीएपी खतांचे वितरण, सूक्ष्म बाजरी कार्यक्रम, डाळींच्या उत्पादनात देशात अव्वल स्थान, तसेच एक रुपयात पिक विमा योजना राबवणारे देशातील एकमेव राज्य असे अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर, एकमताने पुण्यात निवड

VIDEO : तिरूपती बालाजीच्या प्रसादात किडे? धक्कादायक माहिती आली समोर

Marathi News Live Updates : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

Nanded News : सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्याने १० जणांना विषबाधा, १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT