CM Eknath Shinde To Accept Best Agricultural State 2024 Award Saam TV
महाराष्ट्र

Best Agricultural State 2024: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! राज्याला मिळणार कृषी क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार; CM शिंदे दिल्लीत स्वीकारणार सन्मान

CM Eknath Shinde Will Attend Ceremony For Best Agricultural State 2024 Award: महाराष्ट्राला सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार जाहीर झालाय. आज मुख्यमंत्री दिल्लीत सन्मान स्वीकारणार आहेत.

Rohini Gudaghe

प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली

कृषी क्षेत्रात महाराष्ट्र (Maharashtra) राज्य सर्वोत्तम ठरलंय. राज्याला १५ वा प्रतिष्ठीत कृषी नेतृत्व पुरस्कार मिळाला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत पुरस्कार स्वीकारणार असल्याची माहिती मिळतेय. भारताचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्र राज्याला २०२४ चा सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार जाहीर केला आहे.

कृषी क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज १० जुलै रोजी नवी दिल्लीत हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. यावेळी केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्यासह कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, ब्राजील, अल्जीरिया, नीदरलॅंड देशाचे राजदूत, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नागालँड राज्यातील मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. राज्याला हा पुरस्कार शेती संदर्भात सरकारने सुरु केलेल्या नवीन योजना, तसेच शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृषी आणि ग्रामीण विकासासाठी सुरु केलेल्या योजनांसाठी दिला जातोय.

'या' कारणामुळं मिळाला पुरस्कार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २१ लाख हेक्टरवर बांबू लावण्याचं मिशन हाती घेण्यात आलंय. तसंच १७ लाख हेक्टरवर कृषी सिंचन पाणी पोहोचण्यासाठी १२३ योजना राबवण्यात (Best Agricultural State) आल्यात. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची रक्कम दुप्पट करणार महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ठरलंय. सरकारने नॅनो तंत्रज्ञानाद्वारे खतांचे वितरण करण्यासाठी ४.६३ लाख शेतकऱ्यांना मदत केलीय.

आतापर्यंत कुणाला मिळाला पुरस्कार?

सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार २०२३ मध्ये बिहार, तर २०२२ मध्ये तमिळनाडू आणि उत्तरप्रदेशला हा पुरस्कार देण्यात आला होता. या पुरस्काराची सुरूवात २००८ मध्ये डॉ. एमएस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीत करण्यात आली (Best Agricultural State 2024) होती. आंध्रप्रदेशला २००८ मध्ये पहिला पुरस्कार देण्यात आला होता. आतापर्यंत राजनाथ सिंह, वी. कुरियन, दिवंगत नेते प्रकाश सिंह बादल, दिवंगत डॉ. एमएस स्वामीनाथन, रतन टाटा, दिवंगत प्रो. बराक ओबामा यांचे कृषी सल्लागार इस्लाम सिद्दीकी, डॉ. बलराम जाखड़, प्रोफेसर पीके धूमल, शिवराज सिंह चौहान हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT