Belgaum Tragedy Marathi Family Ends Life Saam TV News
महाराष्ट्र

बेळगावात मराठी कुटुंबानं उचललं टोकाचं पाऊल; विष प्राशन करून तिघांनी आयुष्य संपवलं, एकीची प्रकृती गंभीर | Belgaum

Belgaum Tragedy: बेळगावमधील जोशी मळा येथे मराठी कुटुंबातील चौघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. यात तीन जणांचा मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर आहे. पोलीस तपास सुरू आहे.

Bhagyashree Kamble

बेळगावातून मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एकाच मराठी कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. विष प्राशन करून त्यांनी सामूहिक आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. चारपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येमागचं कारण अस्पष्ट असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

कुराडेकर कुटुंब हे बेळगावातील जोशी मळा येथील रहिवासी होते. कुराडेकर कुटुंबातील चार जणांनी एकत्र विष प्राशन केलं. कुटुंबातील ४ जण घरात बेशुद्ध अवस्थेत आढळले. शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी तातडीने सर्वांना रुग्णालयात हलवलं. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिघांना मृत घोषित केलं.

तर, एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेत सुवर्णा कुराडेकर, मंगला कुराडेकर आणि संतोष कुराडेकर या तिघांचा मृत्यू झाला. तर, सुनंदा कुराडेकर यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, त्यांनी तपासाला सुरूवात केली. आत्महत्येमागील मुख्य कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, पोलिसांकडून या घटनेचा सखोव तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gavran Style Paneer Chilli Recipe: आजीच्या हातची गावरान स्टाईल पनीर चिली, आता फक्त १० मिनिटांत बनवा, सोपी रेसिपी

स्मशानात जातो, करणी करतो, चुटकी वाजवतो अन् भूतबाधा काढतो; कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर; धक्कादायक VIDEO व्हायरल

Shocking : धक्कादायक! भर लग्नमंडपात नवरदेवावर हल्ला, बोहल्यावर चढणार इतक्यात...

Google Doodle Equation: गुगल डुडलवर आज गणिताची समीकरणं; जाणून घ्या काय आहे भन्नाट प्रकार

Kids Tea Drinking Risks : लहान मुलांना चहा देत असाल तर सावधान! हे दुष्परिणाम वाचा

SCROLL FOR NEXT