Belagavi Border Dispute SAAM TV
महाराष्ट्र

Belagavi border dispute : दडपशाही सुरू; महामेळाव्याच्या परिसरात जमावबंदी, एकीकरण समिती नेत्यांची धरपकड

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Belagavi border dispute : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं बेळगावात महामेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र मेळाव्याला ऐनवेळी परवानगी नाकारली आहे.

दुसरीकडे कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात येण्यास मज्जाव केला आहे. तर हा महामेळावा रोखण्यासाठी परिसरात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. कर्नाटक पोलिसांकडून दडपशाही सुरू असून, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड सुरू केली आहे.  (Maharashtra News)

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून दरवर्षी बेळगावात महामेळावा आयोजित करण्यात येतो. हा महामेळावा रोखण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी दडपशाही सुरू केली आहे. मेळाव्याच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मेळाव्यासाठी उभारण्यात आलेला मंडपही हटवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

एकीकरण समिती नेत्यांची धरपकड

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला रोखण्यासाठी कर्नाटक पोलीस आणि तेथील प्रशासनानं दबावतंत्राचा वापर सुरू केल्याचं दिसतं. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड सुरू केली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मगराळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budgam Bus Accident Video: काश्मीरमध्ये पुन्हा भीषण दुर्घटना; BSF जवानांनी खचाखच भरलेली खोल दरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

Israel - Hezbollah War : हिजबोल्ला-इस्त्राइलमध्ये युद्ध पेटलं, स्पेशल रिपोर्ट

Maharashtra News Live Updates : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

Pune Crime : शाळकरी मुलीवर अत्याचार, इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं; 'गुड टच, बॅड टच'मुळं धक्कादायक घटना उघड

Nitin Gadkari: माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट, नितीन गडकरी यांनी सांगितला 'तो' प्रसंग

SCROLL FOR NEXT