Maharashtra Vs Karnataka : सीमावादादरम्यान कर्नाटक विधानसभेचं अधिवेशन सुरू होणार; बोम्मई सीमाप्रश्नावर काय बोलणार?

उद्यापासून कर्नाटक विधानसभेचं बेळगाव येथे अधिवेशन सुरू होणार आहे.
Maharashtra and Karnataka border Dispute
Maharashtra and Karnataka border DisputeSaam Tv
Published On

Maharashtra and Karnataka border Dispute : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातला सीमावाद चांगलाच पेटला आहे. दोन्ही राज्याचा वाद केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचला. याचदरम्यान आता उद्यापासून कर्नाटक विधानसभेचं बेळगाव येथे अधिवेशन सुरू होणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटक वादाच्या पार्श्वभूमीवर य अधिवेशनाला महत्त्व असणार आहे. (Latest Marathi News)

Maharashtra and Karnataka border Dispute
'ज्या मराठा समाजाला हिणवलं...', छत्रपती संभाजीराजे यांनी केली संजय राऊतांची कानउघाडणी

कर्नाटक विधानसभेचं उद्या, सोमवारपासून बेळगाव येथे अधिवेशन सुरू होणार आहे. सीमावादामुळे दोन्ही राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक (karnataka) सीमावादावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे या वादामुळे महाराष्ट्र-कर्नाटक वादाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला खूप महत्व आहे

भाजपशासित (BJP) बोम्मई सरकारचं बेळगावमधील हे शेवटचं अधिवेशन असणार आहे. सुमारे दहा दिवस हे अधिवेशन चालणार आहे. कारण, अवघ्या चार-पाच महिन्यानंतर कर्नाटक विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे या अधिवेशनात कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

Maharashtra and Karnataka border Dispute
Sanjay Raut: संजय राऊतांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी, भाजप नेत्याची मागणी; त्या व्हिडीओवरुन विरोधक आक्रमक

कर्नाटक सरकारचा आडमुठेपणा कायम

केंद्राच्या मध्यस्थीनंतर कर्नाटक सरकारची आडमुठेपणाची भूमिका कायम आहे. कारण बेळगावात होणाऱ्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेते सहभागी होणार होते. मात्र त्यांना कर्नाटक सरकाने परवानगी नाकारली आहे.

अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सीमाभागत येण्यासाठी कुणालाही अडवणार नाही, असं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता. मात्र कर्नाटक सरकारची दुटप्पी भूमिका काही दिवसातच समोर आली आहे.

कर्नाटक राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये 4 हजाराहून अधिक पोलीस तैनात आहे. मात्र कायदा सुव्यव्यस्थेचं कारण देत पुन्हा कर्नाटक सरकारने राज्यातील नेत्यांना परवानगी नाकारली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com