maharashtra women commission post Saam tv
महाराष्ट्र

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी बीडच्या महिला नेत्याचे नाव चर्चेत; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

maharashtra women commission post : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर कुणाची वर्णी लागणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. बीडमधील महिला नेत्याचे नाव देखील पुढे आलं आहे.

Vishal Gangurde

रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोगाचे पद रिक्त

बीडच्या ज्योती मेटे यांचे नाव सोशल मीडियावर चर्चेत

सोशल मीडियावर मेटे यांच्या समर्थनार्थ मोहीम

योगेश काशिद, साम टीव्ही

नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण रुपाली चाकणकर यांना चांगलंच महागात पडलं. या प्रकरणी चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पदाचा राजीनामा सुपूर्द केला. आता आयोगाच्या रिक्त पदावर कुणाची वर्णी लागणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं असताना बीडमधील एक नाव चर्चेत आलं आहे. या पदासाठी बीडमधील दिवंगत नेत्याच्या पत्नीचे नाव चर्चेत आलं आहे. त्यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

अशोक खरात हा चेहरा पाहून भविष्य सांगत असल्याचा दावा करायचा. त्याच्याकडे उच्चभ्रू लोकांचा राबता असायचा. अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेते देखील त्याच्या भेटीला यायचे. रुपाली चाकणकर त्याला गुरू मानत. चाकणकर आणि अशोक खरातचे घनिष्ठ संबंध असल्याचे अनेक व्हिडिओतून उघड झालं. त्यानंतर रुपाली चाकणकरांना पदावरून पायउतार व्हावं लागलं. आता या रिक्त जागेवर नव्या महिला नेत्याची वर्णी लागणार आहे.

राष्ट्रवादीकडून दोन नावांची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन महिला नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. प्रतिभा शिंदे आणि वैशाली नागवडे असे दोन्ही महिला नेत्यांची नावे आहेत. या दोघांपैकी एका नेत्याकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचदरम्यान बीडमधील एका महिला नेत्याच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे.

बीडमधील महिला नेत्याची सोशल मीडियावर चर्चा

शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी उच्चशिक्षित असलेल्या ज्योती मेटे यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या समर्थनार्थ सोशल माध्यमांवरही पोस्ट व्हायरल होत आहेत.

कोण आहेत ज्योती मेटे?

मराठा आरक्षणासाठी आग्रही राहणारे शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे यांच्या ज्योती मेटे या पत्नी आहेत. ज्योती मेटे या प्रशासकीय अधिकारी होत्या. त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी चाचपणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जनगणना कामामध्ये कसूर केल्याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल

मराठीत जांभूळ तर बंगाली, पंजाबी आणि गुजराती भाषेत काय म्हणतात?

Shocking : कोल्हापूर हादरलं! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

Shiv Sena Leader Attack: गळाभेटीच्या बहाण्याने जवळ बोलवत गळ्यावर चाकूचा वार; शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला

LPG Price Today : सीएनजीसारखेच रात्रीत एलपीजी गॅसचे दर बदलले? घरगुती सिलिंडर बुक करण्याआधी दर वाचाच

SCROLL FOR NEXT