Manasvi Choudhary
उन्हाळ्याच्या दिवसांत बाजारात आणि रानावनात गडद जांभळ्या रंगाचे फळ पाहायला मिळते, ते म्हणजे जांभूळ
मात्र आजही अनेकांना जांभूळ या फळांविषयी माहिती नाही. जांभूळ हे फळ उन्हाळ्यातच मिळते. यामुळे कोणत्या भागात जांभळाला कोणत्या नावाने ओळखतात काय बोलतात याविषयी पाहूया.
गडद जांभळ्या रंगाचे हे फळ असल्याने मराठी भाषेत जांभूळ हे नाव पडलं असावे.
जांभळाला जावा प्लम आणि ब्लॅक प्लम या इंग्रजी नावाने ओळखतात तर काही भागात मलबार प्लम किंवा इंडियन ब्लॅकबेरी ही नावे प्रचलित आहेत.
हिंदी भाषेत जांभूळ या फळाला जामुन किंवा जमन तर संस्कृतमध्ये जांभूळ या फळाला जांबू किंवा राजाजंबू असे म्हणतात.
बंगाली भाषेत जांभूळ या फळाला काला जाम तर कन्नडमध्ये नेराले हन्नू असे म्हणतात.
तेलगू मध्ये जांभूळ या फळाला नेरेडू किंवा अल्ला नेरेडू तर तमिळ भाषेत नवल पझम असे म्हणतात.
ओडिया भाषेत जांभूळ या फळाला जामू केळी तर आसामीमध्ये जामू, काला जामू या नावाने ओळखतात.
गुजराती भाषेत जांभूळ या फळाला जंबू / काळा जंबू असे म्हणतात.