Beed Saam
महाराष्ट्र

Beed Crime: '२ लाख हवेत', सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ; विवाहितेनं गळफास घेऊन आयुष्य संपवलं

Dowry Demand Turns Deadly: सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यानंतर बीडमधून हुंडाबळीचा प्रकार समोर आला आहे. बीडमध्ये एका विवाहितेनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. तिने गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणी पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचं विवाहितेच्या घरच्यांनी म्हटलं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

शुभांगी संतोष शिंदे असे मृत विवाहित महिलेचं नाव आहे. महिला आपल्या सासरच्या मंडळींसोबत अंबाजोगाई तालुक्यातील गीता गावात राहत होती. लग्नानंतर सासरच्यांकडून सतत हुंड्यासाठी छळ सुरू होता. चार लाख देऊनही आणखी २ लाख रूपयांची मागणी करत असल्याचा आरोप विवाहित महिलेच्या कुटुंबाने केला.

याच त्रासाला कंटाळून विवाहित महिलेनं गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेनंतर शुभांगीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली, तसेच तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोपी माहेरच्या नातेवाईकांनी केला. या नंतर शुभांगी शिंदेंचा मृतदेह स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

मात्र, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं शुभांगीच्या नातेवाईकांनी सांगितलं. या प्रकरणी पोलीस ठाण्याकडून तात्काळ कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप करण्यात येत असून न्याय मिळेल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शुभांगीच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा हुंडाबळी, मानसिक छळ आणि पोलिस यंत्रणेच्या अपयशाचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway वर अपघाताचा थरार! कंटेनरचा ब्रेक फेल झाला अन् ७-८ वाहने एकमेकांना धडकली, अपघातात महिलेचा मृत्यू

Maharashtra Live News Update: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्वाची बैठक पुण्यात पार पडली

Saam Impact: हॉटेलवरील गुजराती पाट्या काढून लावल्या मराठी पाट्या; साम टीव्हीच्या दणक्यानंतर आली जाग|VIDEO

Maharashtra Politics : दहा वर्षे केंद्रात कृषीमंत्री, सहकारासाठी योगदान काय? विखे पाटलांची नाव न घेता शरद पवारांवर टीका

Nag Panchami 2025 : नाग पंचमीच्या तारखेपासून ते पूजेची पद्धत सर्व माहिती घ्या जाणून

SCROLL FOR NEXT