Beed Banner Calling for Donations for Valmik Karad Sparks Political and Legal Controversy Saam Tv
महाराष्ट्र

Beed Banner Controversy: वाल्मिक कराडसाठी निधी मागणाऱ्या व्हायरल पोस्टरमागे कोण?

Valmik Karad Political Connections In Beed: अख्ख्या महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालायला लावणारा क्रुरकर्मा वाल्मिक कराड तुरुंगात आहे.. याच राक्षसाची टोळी पोसण्यासाठी आता आर्थिक मदतीची मागणी केली जातेय.. मात्र ही आर्थिक मदतीची विकृत मागणी नेमकी कुणी केलीय?

Suprim Maskar

हे पोस्टर नीट पाहा... "थोडीशी मदत.. आण्णासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी... सोशल मीडियावर वाल्मिक आण्णाचे नाव आणि चेहरा सातत्याने टिकून राहण्यासाठी आपले आर्थिक सहाय्य फार महत्त्वाचे आहे. फुल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा" अशा आशयाची हे पोस्टर सध्या बीडमध्ये गाजतंय.. याचं पोस्टरवर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासह नामदेव महाराज शास्त्री यांचाही फोटो दिसतोय.. तसचं या पोस्टरमध्ये एक QR कोडही देण्यात आलाय. या पोस्टरमुळे एकच खळबळ उडालीय.

पोस्टरवरचा QR कोड संदीप गोरख तांदळे यांच्या बँक खात्याशी संलग्न असल्याचं उघड झालयं...मुळात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे... अशातच मुंडेंच्या दसरा मेळाव्यातही कराडच्या समर्थकांनी पोस्टर झळकावले होते.. आणि त्यानंतर आता पोस्टरच्या माध्यमातून थेट आर्थिक मदतीचं आवाहन केलं जातयं.. त्यामुळे सरपंच देशमुखांच्या भावानं याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केलीय.. तर माझ्या बदनामीसाठीचा हा खोडसाळपणा करण्यात आल्याचा आरोप संदीप तांदळे यांनी केलाय...

वाल्मिक कराडचे राजकीय नेत्यासोबतचे हितसंबंध याआधीही समोर आलेत..मात्र तुरुंगात असणाऱ्या आरोपीचे बॅनर थेट राजकीय मेळाव्यात झळकावले जात असतील, पोस्टर्सच्या माध्यमातून खुलेआम आरोपीचं समर्थन करून आर्थिक निधी मागितला जात असेल तर अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचायला हवं.. आता या पोस्टरवरून पोलिस कारवाई करणार का? कराडबाबत मौन बाळगणारे राजकीय नेते या पोस्टरबाजीनंतर तरी मौन सोडणार का? असे अनेक प्रश्न निर्माण होतायत..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur Farmer: शेतीच्या फेरफारासाठी 2 वर्षे टाळाटाळ; तहसील कार्यालयातच शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय

Crime News: नवऱ्याला चारित्र्याचा संशय; वाट अडवून भररस्त्यात बायकोसोबत केलं भयानक कृत्य

Nilesh Ghaywal illegal property : घायवळच्या घरावर पोलिसांची धाड, कोण आहे घायवळचा आका? VIDEO

'आनंदाचा शिधा' बंद होणार? लाडकी बहिण योजनेचा फटका

Two Group Clash : भाजप मंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान मोठा राडा; कार्यकर्ते आपापसात भिडले, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT