Beed Ranjeet kasale 
महाराष्ट्र

Beed : वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरसाठी ५० कोटींची ऑफर, पोलीस अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ, व्हिडिओ व्हायरल

Walmik Karad Encounter News : निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरसाठी ५० कोटींची ऑफर मिळाल्याचा दावा करत फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला. बीडमधील प्रकरण पुन्हा चर्चेत.

Namdeo Kumbhar

योगेश काशिद, बीड प्रतिनिधी

Walmik Karad Encounter Ranjit Kasle viral video :बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. आरोपी वाल्मीक कराड याच्या एन्काऊंटरची ऑफर असल्याचा दावा रणजीत कासले यांनी केला आहे. कासले यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करत हा दावा केला आहे. ५० कोटींची ऑफर दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. कासले यांच्या या दाव्यानंतर बीडमधील प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची मला ऑफर होती, असा दावा केलाय. बनावट एन्काऊंटरसाठी ५ कोटी, १० कोटी आणि ५० कोटी रूपयांची ऑफर दिली जाते असं देखील रणजीत कासले यांनी म्हटलेय. कासले यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करत खळबळजनक दावा केला आहे. रणजीत कासले यांचा हा व्हिडिओ बीड मधील सोशल माध्यमांवर चांगलाच वायरल होतोय.

रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अनेक दावे त्यांच्या सोशल माध्यमातून केले आहेत. आता वाल्मीक कराड याच्या एन्काऊंटर बद्दल केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडालीय. गेल्या काही दिवसांपासून बीडमधील घडामोडीने राज्याचे लक्ष वेधलेय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकणानंतर बीडची कायदा सुव्यवस्थेकडे राज्याचे लक्ष लागले होते. आता त्याच कासलेने केलेल्या नव्या दाव्याने खळबळ उडाली.

रणजीत कासले चर्चेत येणाची ही काही पहिली वेळ नाही. कासले यांनी गुजरातमध्ये जाऊन एक कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचे समोर आले होते. खंडणीचे पैसे घेतानाचा कासले यांचा व्हिडिओ समोर आला होता. तसेच काही फोटोग्राफही समोर आले आहेत ज्यात बंदूक ठेवून दहशत निर्माण करत असल्याचे दिसते. याप्रकारानंतर कासले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आता सोशल मीडियाच्या माध्यामातून खळबळजनीक दावा केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple cutting Tips: सफरचंद कापल्यानंतर काळे का पडतात?

Bridal Look Care: या ५ चुकांमुळे नेहमी खराब होतो ब्राइडल लूक...; तुमचं लग्न जर यावर्षी ठरलं असेल तर घ्या ही काळजी

Ginger Garlic Paste: मीठ आणि तेल वापरून बनवा आलं- लसूणाची पेस्ट, दिर्घकाळ टिकेल

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Maharashtra Politics: शिवसेनेत उलथापालथ! भास्कर जाधवांच्या निकटवर्तीयाची ठाकरे गटातून हकालपट्टी; कोकणात राजकीय भूकंप

SCROLL FOR NEXT