Beed
Beed Saam
महाराष्ट्र

बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्र्यांच्या नावांनी शहरभर मागितली भीक

विनोद जिरे

बीड: "सरकार सत्तेसाठी भुकेला अन् एसटी कर्मचारी भिकेला" अशा नावाचे फलक गळ्यात अडकवून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहनमंत्र्यांच्या नावाने शहरभर भीक मागितली. हे अनोखं आंदोलन बीडच्या (Beed) पाटोदा येथील एसटी कर्मचाऱ्यांनी, आज प्रजासत्ताक दिनी पाटोदा शहरात भीक मागून केलं आहे. पाटोदा बसस्थानक आवारात गेल्या 89 दिवसांपासून, एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय. "आमचं शासनात विलीनीकरण करा", ही प्रमुख मागणी घेऊन हे आंदोलन सुरू आहे. मात्र राज्यभर आंदोलन सुरु असताना, सरकार आणि सरकारमधील मंत्री याची कोणतीच दखल घेत नाही, आतापर्यंत 75 आमच्या आयाबहिणींची कुंकू पुसले, तरीही या सरकारला जाग येत नाही, असं म्हणत जर या सरकारच्या तिजोरीत आम्हाला देण्यासाठी पैसे नसतील, या सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार आला असेल. तर त्यामुळं आम्ही हे भीक मागून जमवलेले पैसे सरकारला मनिऑर्डर करत आहोत.

त्यामुळं त्यांच्या तिजोरीवरील काहीसा आर्थिक भार हलका होईल. आणि जर सरकारची आमचं विलीनीकरण करण्याची इच्छाच नसेल तर आम्हाला त्यांनी सांगावं भिक मागा, आम्ही आयुष्यभर भीक मागून त्यांना पैसे देऊ. अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. तर यावेळी पाटोदा शहरातील पानटपरी, फळगाडे, मेडिकल, किराणा दुकान, हॉटेल यासह जवळपास सर्वच दुकानदारांना भीक मागून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय. दरम्यान या अनोख्या आंदोलनाने पाटोदा शहरात चांगलीच चर्चा रंगू लागली असून सरकार याची दखल घेणार का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT