परिस्थिती कशीही असो, पण आपल्या काळजाच्या तुकड्यांनी जीवनात भरभरून यश मिळवलं. तर तो आनंद गगनात मावेनासा होतो. याचं उत्तम उदाहरण बीडमध्ये पाहायला मिळालं.
शेती आणि कुटुंब याच्या पलीकडं येथील एका शेतकरी बापानं काहीच पाहिलं नव्हतं. पण मुलाला नोकरीत प्रमोशन मिळालं आणि बापानं एकच आनंदोत्सव साजरा केला. तोही तोफा वाजवून. या गावखेड्यात राहणाऱ्या बापाच्या मनातील आनंद भरपूर काही सांगून जातोय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बीड पोलीस दलात भागवत शेलार हे पोलीस शिपाई म्हणून काम करतात. पण या कामात त्यांनी आपल्या कष्टाचं चीज केलंय. नुकतंच त्यांचं प्रमोशन झालंय. एका पोलीस शिपाईवरून ते आता पोलीस हेडकॉन्स्टेबल झालेत. भागवत शेलार यांच्या प्रमोशनबद्दल कळताच त्यांच्या वडिलांचं उर भरून आलं. त्यांनी थेट गावातील एक दुकान गाठलं. (Latest Marathi News)
त्यानंतर दुकानातून दोन तोफा विकत घेतल्या आणि घरी आले. या तोफा त्यांनी गावातील बस स्टँडवर वाजवल्या. मुलानं आपल्या आयुष्यात उंच भरारी आणि आकाशी झेप घेतल्यामुळं बापाचं काळीज भरून आलं आणि डोळ्यात आनंदअश्रू आले.
यावेळी भागवत शेलार यांनी स्वत: आपल्या वडिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. व्हिडीओ शेअर करताना, त्यांनी आपल्या वडिलांसाठी दोन ओळी लिहिल्यात. ''आज काय लिहावं तेच सुचत नाही. वडिलांच्या डोळ्यात दोन वेळा पाणी पाहिलं मी, एक जेव्हा मी पोलीस भरती झालो आणि त्यांचे आशीर्वाद घेतले आणि आज माझ्या प्रमोशन बद्दल माहिती झाल्यावर.''
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, ''विशेष म्हणजे वडिलांनी मला काही एक न सांगता दुकानावर जाऊन दोन तोफा आणल्या व त्या वाजवल्या. भाऊ कितीही जन्म मिळाले तरी देव मला तुमच्या पोटी जन्म देवो. माझं झालेलं प्रमोशन खूप छोटं आहे. पण आज भाऊ (वडील) यांनी जे केलं ते अविस्मरणीय आहे.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.