Beed: आईसह 2 चिमुकल्या मुलींना सर्पदंश; दोन्ही मुलींचा मृत्यू! विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed: आईसह 2 चिमुकल्या मुलींना सर्पदंश; दोन्ही मुलींचा मृत्यू!

बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या सोने सांगवी गावात, अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे.

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड - बीडच्या Beed केज तालुक्यात असणाऱ्या सोने सांगवी गावात, अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील आईसह दोन चिमुकल्या मुलींना, मध्यरात्री सर्पदंश झाल्याने, दोन्ही मुलीचा मृत्यू झाला आहे. तर आईची मृत्यूशी झुंज सुरू आहे. स्वप्नाली साखरे (वय 5 वर्ष) व स्वीटी साखरे (वय 3 वर्ष) अशी मयत चिमुकल्या मुलींची नावे आहेत. तर आई जयश्री दीपक साखरे यांची, अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे.

हे देखील पहा-

केजच्या Kej सोनेसांगवी गावातील दीपक साखरे हे कुटुंबासह पत्नी जयश्री साखरे (वय 30 वर्ष), मुलगी स्वप्नाली साखरे व स्वीटी साखरे हे चौघे घरात झोपले होते. यादरम्यान जयश्री साखरे यांच्यासह दोन्ही चिमुकल्या मुलींना विषारी साप चावला. त्यात स्वप्नाली साखरे व स्वीटी साखरे या दोन्ही चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला.

तर आई जयश्री साखरे यांच्यावर अंबाजोगाई च्या स्वामी रामाननंद तिर्थ रुग्णायात उपचार सुरू आहेत. एकाच कुटुंबातील तिघांना सर्पदंश होऊन दोन चिमुकल्यांचा जीव गेल्याच्या अत्यंत दुःखद आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: गणेशोत्सवाआधी सोने- चांदीचे भाव घसरले, प्रति तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार?

Maharashtra Live News Update: परळीत मनोज जरांगे पाटील यांच्या बॅनरवर झळकले दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचा फोटो...

..तर PM-CMची खूर्ची जाणार; १३० व्या घटनादुरूस्ती विधेयकेवर अमित शहा काय म्हणाले?

नांदेडकरांचे स्वप्न सत्यात उतरले, २४ तासात वंदे भारत धावणार, वाचा A टू Z माहिती

Tejashri Pradhan-Subodh Bhave: तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेच्या वयातील अंतर किती?

SCROLL FOR NEXT