Beed Couple Sucide News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : सावत्र आई अन् मुलाच्या प्रेमसंबंधांचा भयंकर शेवट, प्रियकराच्या आत्महत्येनंतर प्रेयसीने घेतला टोकाचा निर्णय

Beed Aambejogai Crime News : बीडमध्ये सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधांचा धक्कादायक शेवट झाला. बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली, तर त्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने रुग्णालय परिसरात गळफास घेत जीवन संपवले.

Alisha Khedekar

  • बीडमध्ये सावत्र आई आणि मुलाच्या संबंधांचा दुर्दैवी शेवट

  • बदनामीच्या भीतीने २१ वर्षीय मुलाने आत्महत्या केली

  • प्रियकर मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आई अनिताने गळफास घेतला

  • अंबाजोगाई शहर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत

Beed Ambajogai Sucide News बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईतून खळबळजनक घटना समोर आली आहे. सावत्र आई आणि मुलामधील अनैतिक संबंधांचा दुर्दैवी शेवट झाला आहे. बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली, तर त्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने रुग्णालय परिसरात गळफास घेत जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील सोनी जवळा येथील रहिवासी साहेबराव पवार यांनी चार वर्षांपूर्वी अनिता नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले होते. साहेबराव यांच्या पहिल्या पत्नीपासून अनिल नावाचा २१ वर्षीय मुलगा होता. दरम्यान, अनिल आणि त्याची सावत्र आई अनिता यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. हे संबंध इतके वाढले की काही दिवसांपूर्वी दोघेही घरातून पळून जाऊन तेलंगणा राज्यात राहू लागले. पत्नी आणि मुलगा बेपत्ता झाल्यानंतर साहेबराव पवार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने दोघांचा शोध घेत तेलंगणामधून त्यांना ताब्यात घेतले. मात्र, आपले संबंध समाजासमोर उघड झाल्याने अनिल मानसिक तणावात गेला होता.

नैराश्यातून त्याने विष प्राशन केले. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. चार दिवस उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. अनिलच्या मृत्यूची बातमी समजताच अनिता हिला मोठा मानसिक धक्का बसला.

हा धक्का सहन न झाल्याने तिने रुग्णालय परिसरातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. झाडाला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणामुळे परिसरात संताप आणि चर्चा सुरू असून या घटनेचा पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT