Beed Shock Saam tv news
महाराष्ट्र

बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर अत्याचार, प्रायव्हेट फोटो काढून ब्लॅकमेलिंग, काळंनिळं होईपर्यंत मारलं; बीड हादरलं

Beed Shock: पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिंदे यांनी एका विवाहित महिलेवर बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार केला आणि तिचे विवस्त्र फोटो काढून ब्लॅकमेल केलं.

Bhagyashree Kamble

  • बीडमधील पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिंदे यांच्यावर विवाहितेवर अत्याचाराचा गंभीर आरोप.

  • अत्याचार केल्यानंतर पीडितेचे विवस्त्र फोटो काढून ब्लॅकमेल केल्याचा आरोप.

  • आरोपीविरोधात गुन्हा दाखल; मात्र अजूनही आरोपी फरार.

  • 'रक्षकच बनले भक्षक' म्हणत स्थानिकांनी व्यक्त केला तीव्र संताप.

दिवसेंदिवस बीडमध्ये गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच बीडमधील आणखी एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. बीडमधील एका पोलीस उपनिरीक्षकाने गावातील विवाहित महिलेवर बंदुकीचा धाक दाखवत जबरदस्तीने अत्याचार केला असून, पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ शूट करून तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप आरोपीला अटक झालेली नाही. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

रवींद्र शिंदे असे पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली. आरोपीचे गावातीलच विवाहित महिलेवर वाईट नजर होती. घटनेच्या दिवशी आरोपीनं महिलेवर जबरदस्ती केली. नंतर तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार करत त्यानं महिलेचे काही विवस्त्र फोटो काढले. तसेच या फोटोंच्या आधारे त्यानं पीडित महिलेला ब्लॅकमेल केलं.

पीडितेनं आरोपीच्या त्रासाला कंटाळून शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पोलिसांनी रवींद्र शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मोकाट असून, अद्याप तो पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही.

सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर रक्षकच बनले भक्षक, असं महणण्याची वेळ आली आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी पोलीस अधिकाऱ्याविरोधात रोष व्यक्त केला असून, आरोपीचा शोध आणि पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Artist Death: प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

Maharashtra News Live Update: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ

RCB vs GT IPL 2026 Final: कोण जिंकणार आयपीएल २०२६चा कप? RCB आणि GT मधील महसंग्राम कुठे, केव्हा आणि कसा पहाल?

Rules Change June 2026: ATM चा व्यवहार ते एलपीजी, १ जूनपासून कोणकोणते बदल होणार?

वयाची पन्नाशी ओलांडली तरी दिसते इतकी सुंदर; 'धक धक गर्ल'चं गुलाबी सौंदर्य पाहून उडेल झोप

SCROLL FOR NEXT