Beed Shock Mother-Daughter Attacked with Iron Rods over Land Dispute LATEST beed crime news Saam Tv
महाराष्ट्र

जागेचा वाद टोकाला! मायलेकीसह तिघींवर प्राणघातक हल्ला, लोखंडी रॉडनं काळंनिळं होईपर्यंत मारलं

Beed Crime news: बीडच्या चऱ्हाटा येथे जागेच्या वादातून तुफान राडा. लोखंडी पाईप आणि रॉडने महिलांवर हल्ला, दोघी जखमी. घटनेचा व्हिडिओ व्हायरल, गावकऱ्यांचा संताप व्यक्त.

Bhagyashree Kamble

  • बीडच्या चऱ्हाटा येथे जागेच्या वादातून तुफान राडा.

  • लोखंडी पाईप आणि रॉडने महिलांवर हल्ला, दोघी जखमी.

  • घटनेचा व्हिडिओ व्हायरल, गावकऱ्यांचा संताप व्यक्त.

  • पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला.

बीडमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच आणखी एका गुन्हेगारी घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. जागेच्या कारणावरून मायलेकीसह इतर तिघींवर लोखंडी पाईप आणि रॉडने हल्ला करण्यात आला आहे. ४ ते ५ जणांनी मिळून हा हल्ला केल्याची माहिती आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

बीडच्या चऱ्हाटा येथे हा धक्कादायक प्रकार घडला. जागेच्या कारणावरून दोन गटांत तुफान राडा झाला. आधी शाब्दिक बाचाबाची झाली नंतर हाणामारी सुरू झाली. चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी माय लेकीसह इतर तिघींवर हल्ला केला. लोखंडी पाईप आणि रॉडने टोळक्यांनी महिलांवर हल्ला केला.

या हल्ल्यात महिलांनी गंभीर दुखापत झाली. त्यांचं शरीर काळंनिळं पडलं होतं. या घटनेचा एकानं व्हिडिओ शूट केला. तसेच सोशल मीडियावर केला. संबंधित व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी आणि गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. या भीषण हल्ल्यात दोघी जखमी असून, त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपींविपोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. आरोपींचाही शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

Ambernath : अंबरनाथमध्ये तरुणावर हल्ला, पुतणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून काकाने काढला राग; ५ आरोपींवर गुन्हा

Ketan Agarwal Case: केतन अग्रवालच्या हत्येआधीचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर, सिया अन् चेतन होते सोबत

संजय दिना पाटील यांची पत्रकारांना शिवीगाळ; मुख्यमंत्री काय म्हणाले? VIDEO

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात पावसाचे आगमन

SCROLL FOR NEXT