Beed : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेकापचे अर्धनग्न आंदोलन!
Beed : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेकापचे अर्धनग्न आंदोलन! विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेकापचे अर्धनग्न आंदोलन!

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनाम्याचे नाटक थांबवून, सरसकट 50 हजार रुपये हेक्‍टरी तात्काळ मदत द्या. मागील वर्षाचा पिक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अन्यथा आमदार-खासदारांना जिल्ह्यात फिरू देणार नाही. असा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं.

हे देखील पहा :

यावेळी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली. मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शासनाचे अधिकारी पंचनाम्याचे नाटक करत असून पंचनाम्याचे नाटक थांबवून शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी 50 हजार रुपयांची तात्काळ मदत द्यावी. अशी मागणी यावेळी करण्यात आलीय.

एफआरपी चे तीन तुकडे न करता उसाची एफआरपी एकरकमी 14 दिवसाच्या आत देण्यात यावी, त्याबरोबरच 2020 मधील पिक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, नदीकाठच्या पूरग्रस्त भागातील गावांचा पुनर्वसन करा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies: उष्णता वाढल्याने जिभेला फोड आले आहेत? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेच २०२९ पर्यंत मुख्यमंत्री राहतील; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मोठा दावा

Love Marriage Tips : लव्ह मॅरेज करताय? सासूबाईंना इंप्रेस करण्यासाठी खास टीप्स

Airtel Data Plans: 'हे' आहेत एअरटेलचे ५ स्वस्त डेटा रिचार्ज प्लान! पहा संपूर्ण यादी

Today's Marathi News Live : उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT