Beed: सोशल मीडियावरून शाळकरी मुलींशी ओळख निर्माण करत; पळवून नेहून बलात्कार विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed: सोशल मीडियावरून शाळकरी मुलींशी ओळख निर्माण करत; पळवून नेहून बलात्कार

बी.एस्सी शिक्षण घेणाऱ्या आरोपी तरुणाकडून सोशल मीडियाचा फायदा घेत, शाळकरी मुलीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात

विनोद जिरे

बीड: सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून कोण कधी काय करेल? हे सांगता येत नाही. कधीकधी या सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून अनेक चांगले काम होतात, कित्येकांना न्याय (Justice) देखील मिळत असतो. तर एखादा सोशल मीडिया स्टार देखील होतो. मात्र, याच सोशल मीडियाचा आपली हाऊस पूर्ण करण्यासाठी, अनेक धोकेबाज तरुणांकडून वापर केला जात आहे. यामध्ये वयाचे देखील भान रहात नाही. असाच काहीसा प्रकार बीड (Beed) शहरात उघडकीस आला आहे. (Beed sexual assualt minor girl acquaintance social media)

हे देखील पहा-

बीड (Beed) शहरात राहणाऱ्या एका नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या, 14 वर्षीय शाळकरी मुलीसोबत, 21 वर्षीय बी.एस्सी शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन (College) तरुणाची, सोशल मिडीयावरून ओळख झाली. या ओळखीचे मैत्रीत (Friendship) रूपांतर झाले होते. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमही देखील झाले. याचाच गैरफायदा घेत आरोपी तरुणाने, मुलीला आमिष दाखवून 10 फेब्रुवारी 2022 रोजी पळवून नेले होते. यादरम्यान तो पुण्यातील (Pune) कात्रज भागात, एक प्लॅट किरायने घेऊन राहिला होता.

मात्र यादरम्यान 16 फेब्रुवारी दिवशी बीडच्या (Beed) शिवाजीनगर पोलिसांनी (police) अखेर त्याला बेड्या ठोकले आहेत. शेख समीर शेख अजिमोद्दीन (वू-21) रा. बीड असे त्या आरोपी तरुणाचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी आरोपी शेख समीर याची सोशल मीडियावरून, शहरामधील नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख झाली होती. त्यांनतर त्या दोघात मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते.

यादरम्यान 10 फेब्रुवारी रोजी त्याने मुलीला घेऊन बीडमधून पलायन केले होते. त्यानंतर पुण्यातील कात्रज परिसरात फ्लॅट भाड्याने घेऊन ते तेथे राहिले होते. यादरम्यान, त्याने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला आहे. दरम्यान याप्रकरणी मुलीच्या जबाबावरून कलम 376 सह पोस्को आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान असे प्रकार घडू नयेत, यासाठी अल्पवयीन मुलींसह महिलांनी, सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहन पोलीस उपाधीक्षक संतोष वाळके यांनी यावेळी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindustani Bhau On Raj Thackeray: मारणं खूप सोपं असतं पण एकत्र आणणं अवघड, हिंदुस्तानी भाऊची राज ठाकरेंना विनंती

Jupiter Saturn Yuti effects: 12 वर्षांनी गुरु-शनि बनवणार दुर्लभ संयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार, पैसाही येणार हाती

Jalna : बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याचे अपहरण; ५० लाख रुपयांची खंडणी मागणारे दोघे अटकेत, जालना जिल्ह्यात खळबळ

Mughal harem: मुघल हरममध्ये रात्रीच्या वेळेस दासींना कोणती कामं करावी लागत?

Kitchen Hacks: पावसाळ्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर ताजेतवाने कसे ठेवाल? जाणून घ्या खास टिप्स

SCROLL FOR NEXT