Satish Bhosale VIP treatment video in jail viral  Saam TV News
महाराष्ट्र

Satish Bhosale : रसरशीत बिर्याणी, मिनरल वॉटर; 'आका'नंतर 'खोक्या'ला VIP ट्रीटमेंट? काय आहे प्रकरण?

Satish Bhosale Jail Video : खोक्या मस्त नातेवाईंकांच्या घोळक्यात आहे. खोक्याला मस्त रसरशीत बिर्याणी खाऊ घातली जाते. त्यानंतर तो हातही धुतोय ते मिनरल वॉटरने. जवळच्या लोकांशी तो मस्त गप्पा मारतोय, आणि इथे पोलिसही दिसताहेत, पण ते केवळ अस्तित्वापुरतं.

Girish Nikam

गिरीश निकम, साम टीव्ही

बीड : बीडमध्ये वाल्मिक कराडनंतर सतीश उर्फ खोक्या भोसलेलाही व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचं समोर आलंय. साम टीव्हीनं याची बातमी दाखवल्यानंतर पोलीस आयुक्तांनी २ पोलिसांचं निलंबन केलंय. पाहूया खोक्याची कशी बडदास्त ठेवली जात होती.

खोक्या मस्त नातेवाईंकांच्या घोळक्यात आहे. खोक्याला मस्त रसरशीत बिर्याणी खाऊ घातली जाते. त्यानंतर तो हातही धुतोय ते मिनरल वॉटरने. जवळच्या लोकांशी तो मस्त गप्पा मारतोय, आणि इथे पोलिसही दिसताहेत, पण ते केवळ अस्तित्वापुरतं.

पैशांचा माज दाखवणारे रिल्स, क्रूरपणे मारहाण करणे, वन्यप्राण्यांची शिकार या प्रकरणांमध्ये त्याल अटक झाली. मात्र कोठडी सुनावल्यानंतर कारागृहात जाण्यापूर्वीच त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे या व्हिआयपी ट्रीटमेंटची साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग आली. वरिष्ठांनी त्याची गंभीर दखल घेतलीये. विनोद सुरवसे आणि कैलास खटाणे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

यापूर्वी सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडलाही हॉस्पिटल आणि जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर खोक्या भोसलेला दिलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटमुळे बीड पोलिसांचे गुन्हेगारांसोबत असलेले लागे-बांधे पुन्हा एकदा समोर आलेत. कर्त्यव्य कठोर पोलिस अधिक्षक नवनीत कावोत यंत्रणेत शिस्त आणणार का? हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

Amruta Dhongade: अमृताचा बोल्डनेस पाहून तुम्हालाही भरेल हुडहुडी

Param Sundari vs Baaghi 4 : सिद्धार्थ मल्होत्रा अन् टायगर श्रॉफमध्ये कांटे की टक्कर, 'बागी ४'नं ओपनिंग डेलाच केली बक्कळ कमाई

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

SCROLL FOR NEXT