Beed Santosh Deshmukh killed case Saam Tv News
महाराष्ट्र

मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केजमध्ये नव्हे, आता केस चालणार 'या' कोर्टात...

Santosh Deshmukh Murder Case in Beed Court : बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला आता केज कोर्टात नाहीतर बीडच्या कोर्टात होणार आहे.

Prashant Patil

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा खटला कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्याचबरोबर साक्षीदार आणि आरोपी एकाच भागातले असल्यामुळे प्रकरणावर परिणाम निर्माण होतील. तसेच कायदा सुव्यवस्था निर्माण होईल या पार्श्वभूमीवर एसआयटीकडून बीडच्या मुख्य न्यायाधीशांकडे विनंती अर्ज करण्यात आला होता की, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केज न्यायालयात चालवण्याऐवी बीड न्यायालयात चालवावा.

यावर दोन सुनावण्या पार पडल्या. दरम्यान, काल १८ मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी विशेष वकील बाळासाहेब कोल्हे आणि आरोपीचे वकील अनंत तिडके आणि राहुल मुंडे यांच्या युक्तिवादानंतर निकाल राखीव ठेवला होता. तो निकाल आज न्यायाधीशांकडून देण्यात आला आहे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार आहे. मुख्य न्यायाधीश यांच्याकडून एसआयटीचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: शनिवारी कार्तिक चतुर्थी! व्यवहार, चर्चा आणि निर्णयांसाठी अनुकूल दिवस; 4 राशींवर विशेष कृपा

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

SCROLL FOR NEXT