Vaibhavi Deshmukh Saam
महाराष्ट्र

12th HSC Result: संतोष देशमुखांची लेक झाली पास! बारावीला मिळाले इतके गुण, कुटुंबियांचे डोळे डबडबले

Beed Santosh Deshmukh daughter Vaibhavi Deshmukh: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या लेकीचा बारावीचा निकाल समोर आला आहे. वैभवी देशमुख हिला बारावीला ८५. ३३ टक्के मिळाले आहेत.

Bhagyashree Kamble

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या लेकीचा बारावीचा निकाल समोर आला आहे. वैभवी देशमुख हिला बारावीला ८५. ३३ टक्के मिळाले असल्याची माहिती समोर आली आहे. आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला. वैभवी देशमुख हिचं देखील हे बारावीचं वर्ष होतं. तिने बारावीला ८५. ३३ टक्के मिळवून यश संपादन केलंय.

दिवंगत संतोष देशमुख यांचं निर्घृण हत्या करण्यात आली होती. कुटुंबावर दुखा:चं डोंगर होता. तरी देखील मागे न हटता, या परिस्थितीतून जात वैभवीने चिकाटीने अभ्यास करून अव्वस गुण मिळवले.

निकाल लागल्यानंतर वैभवी देशमुख हिने साम टीव्हीशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली, 'आज मिळालेले गुण आनंद देणारे असले तरी, वडिलांच्या अनुपस्थितीने तो आनंद अधूरा आहे. त्यांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या साथीने हे यश मिळवता आलं. दुखा: च्या अशा डोंगरांना आम्ही कधीच सामोरे गेलो नव्हतो. पण आता त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे', अशी प्रतिक्रिया वैभवीने दिली.

'आज ते सोबत नसले, तरी त्यांच्या आठवणी आणि शिकवणी माझ्यासोबत आहे', असं म्हणत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. निकाल लागताच मस्साजोग गावातील ग्रामस्थांनी वैभवीला कौतुकाची थाप दिली. यावेळी देशमुख कुटुंबातील लोकांचे डोळे डबडबले होते.

दुखा:चा डोंगर तरीही अव्वल गुणांनी पास

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ साली निर्घृण हत्या करण्यात आली होती. यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. याच वर्षी संतोष देशमुख यांची लेक बारावीच्या परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करत होती. देशमुख कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असला तरी, न डगमगता तिने ८५.३३ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahesh Manjrekar: आज शिवाजी महाराज असते तर...; महेश मांजरेकरांसह 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाचे कलाकार साई चरणी नतमस्तक

Surya Gochar Luck: सूर्य तूळ राशीत करणार मार्गक्रमण, मिथुन, सिंहसह आणखी एक रास होणार मालामाल

Jalgaon : धरणात पोहण्यासाठी उतरणे जीवावर बेतले; तरुणाचा बुडून मृत्यू

Silver Rate Prediction: सोन्यापेक्षा चांदीनं केलं मालामाल! १० महिन्यात ₹९०,००० वाढ, आता खरेदी करणे योग्य का?

OBC Reservation: बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा! गेवराईतून 500 गाड्यांचा ताफा रवाना|VIDEO

SCROLL FOR NEXT