Beed News Accident Saam Tv News
महाराष्ट्र

Beed Accident: मध्य रात्रीत भररस्त्यावर वाद, दुचाकीला महागड्या गाडीने उडवलं; रस्त्यावर रक्ताचा सडा, बीडमध्ये खळबळ

Beed Road Accident: बीड शहरात स्कॉर्पिओने दोन मोटरसायकलस्वारांना गंभीर जखमी केले. पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि एकाला अटक केली आहे. तपास सुरू आहे.

Bhagyashree Kamble

बीडमध्ये भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे. दुचाकीवरून जात असलेल्या दोघांना स्कॉर्पिओने उडवलं. ही घटना शनिवारी मध्य रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातानंतर दोघेही गंभीर जखमी झाले असून, दोघांवर बीडच्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, बीड शहर पोलिसांनी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करत एकाला अटक केली आहे.

मोहम्मद समी मोहम्मद कलीम शेख आणि सय्यद दानिश सय्यद एत शाम उल हक असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. हे दोघे रात्री आपल्या स्कुटीवर घराकडे जात असताना जालना रोडवर स्कॉर्पिओ चालकाशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर दुचाकीवरून दोघे निघून गेले. भरधाव स्कॉर्पिओने त्यांचा पाठलाग केला.

जालना रोडवरून मुंडा रोड मार्गे पाठलाग करत स्कॉर्पिओने डीपी रोडवरील सारडा कॅपिटलसमोर दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर स्कार्पिओ चालक फरार झाला. जोराची धडक बसल्यामुळे दोघेही डोक्यावर पडले आणि रक्तबंबाळ झाले. डोक्याला जबर मार लागल्यानंतर दोघेही रस्त्यावर बेशुद्ध पडले.

त्यावेळी पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांनी तातडीने येऊन त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. यापैकी एक जण पाच मिनिटांनी उठण्याचा प्रयत्न केला, परंतु काही सेकंदातच तो पुन्हा जमिनीवर कोसळला.

स्कॉर्पिओ कोणाची होती आणि त्यात किती जण होते? याचा शोध पोलिसांनी दिवसभर घेतला, परंतु पोलिसांच्या हाती काहीच आले नाही. रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी स्कॉर्पिओ पकडली. या प्रकरणी सहा जणांविरोधात बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये भाजपाची आढावा बैठक सुरू

Nanded Rain : गोदावरी, असना नदीच्या पुराचे पाणी शेतात; शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचा झाला चिखल

Pune Politics: पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यांनी सोडली साथ, राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

Varicha Bhat Recipe: उपवासाचा वरीचा भात कसा बनवायचा? सोपी रेसिपी

Sleep Health: तुम्ही दररोज उशीरा उठता? मग वजनावर होणारा 'हा' धक्कादायक परिणाम नक्की वाचा

SCROLL FOR NEXT