Indian railway  saam Tv
महाराष्ट्र

बीडच्या पटरीवर ट्रेनचा आवाज दुमदुमणार, आष्टी ते अहमदनगर प्रवासी रेल्वेचा 'या' दिवशी होणार शुभारंभ

बीड जिल्ह्यातील रेल्वेबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

बीड : जिल्ह्यातील रेल्वेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अनेक दिवसांपासून बीडच्या नागरिकांना प्रतीक्षा असलेल्या बीड रेल्वेच्या (Beed Railway) मुहर्तू अखेर ठरला आहे. बीड जिल्ह्यातील अहमदनगर-आष्टी दरम्यानची रल्वेसेवा २३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी कुमार वैष्णव (Ashwini Vaishnaw) , केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ पार पडणार आहे. (Beed Railway latest News Update)

नगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील आष्टी पर्यंतचे पूर्ण काम झाले आहे.आष्टी सोलापूरवाडी आणि नारायणडोह हे तीन स्टेशन पूर्ण झाले आहेत. या ट्रॅकवर रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या वतीने संपूर्ण तपासणी करण्यात आलीय.या ट्रॅकवर १२० प्रति तास वेगाने मोठी रेल्वे धावलीय.त्यामुळे या ट्रॅकवरील रेल्वेचा मार्ग मोकळा झाला आहे.

आता या रेल्वेचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी कुमार वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार डॉ प्रीतम मुंडे, नगरचे खासदार डॉ सुजय विखे यांच्यासह रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान अहमदनगर-आष्टी रेल्वे सुरु होणार असल्याने आष्टी तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रवासाची उत्सुकता वाढली आहे. प्रत्यक्षात रेल्वे सुरु होण्याचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimple Skin Care: हनुवटीवर सतत मुरूमं येतायेत? मग या ६ सवयी टाळा

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र|VIDEO

Raigad Politics: रायगडमधील राजकारण फिरलं, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती; शिंदे सेनेला डावलले

Maharashtra Live News Update: काँग्रेसने अकोला जिल्ह्यातील नगराध्यक्षपदाचे दोन उमेदवार केले जाहीर

BMC News : सिंगल-यूज प्लास्टिकवर १००% बंदी, नियम तोडणाऱ्यांवर कायमस्वरूपी कारवाई, मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT