पुष्पाला सांगा डॉन आलाय; क्षीरसागर बंधूंत राजकारण तापलं..! पहा Video
पुष्पाला सांगा डॉन आलाय; क्षीरसागर बंधूंत राजकारण तापलं..! पहा Video SaamTvNews
महाराष्ट्र

पुष्पाला सांगा डॉन आलाय; क्षीरसागर बंधूंत राजकारण तापलं..! पहा Video

विनोद जिरे

बीड : काही महिन्यांवर नगरपालिका निवडणूक येऊन ठेपली असतानाच, बीड मधील क्षिरसागर बंधूतील राजकारण तापलं आहे. सिनेमातील गाणे आणि डायलॉग म्हणत एकमेकांना टोकाचे इशारे दिले जात आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांनी (MLA Sandeep Kshirsagar) "पुष्पा झुकेंगा नही" या म्हटलेल्या डायलॉगला, भाऊ नगरसेवक योगेश क्षीरसागरांनी "मैं हूँ डॉन" म्हणत शायरांना अंदाजात सडेतोड उत्तर दिलंय. तर "पुष्पा ला सांगा डॉन आलाय", म्हणत हा व्हिडिओ (Video) आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

योगेश क्षीरसागर यांनी गाणं गायलेला व्हिडिओ :

बीडमध्ये (Beed) क्षीरसागर घराण्यातील भाऊबंदकीतील वाद, आता सर्वश्रुत झाला आहे. राष्ट्रवादीचे आ.संदीप क्षीरसागरांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांचा पराभव केल्यानंतर, आता संदीप क्षीरसागर यांच्या विरुद्ध दंड थोपटत, सख्खे चुलत बंधू नगरसेवक योगेश क्षीरसागर पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले आहेत. मागील काही दिवसापुर्वी, बीड शहरातील माळीवेस भागात एका पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात, आ.संदीप क्षीरसागर यांनी ‘पुष्पा’ (Pushpa) सिनेमामधील ‘मैं झुकेगा नहीं साला’ हा मारलेला डायलॉग (Dialogue) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

तर, आता या डायलॉगला उत्तर देत, नगरसेवक योगेश क्षीरसागर यांनीही, वडील डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने आयोजित संगीत रजनी कार्यक्रमात, शायराना अंदाजात ‘मै हुँ डॉन’ हे गाणे गायले. तर आता या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत असून व्हायरल होत आहे. तर या व्हिडीओ खाली कार्यकर्त्यांनी ‘पुष्पाला सांगा डॉन आलाय’ म्हणत प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

बीड नगर परिषदेच्या निवडणुकीतून डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी आपले चिरंजीव नगरसेवक डॉ.योगेश क्षीरसागर यांना पुढे करत ‘योगेश पर्व’ सुरु झाल्याचे अधिकृत जाहीर केले आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत माजी मंत्री क्षीरसागर आणि नगराध्यक्ष क्षीरसागर यांचा नगरपालिकेतील चेहरा म्हणून योगेश क्षीरसागर हेच असणार आहेत. तर आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडून त्यांचे बंधू उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांना पुढे केलेलं आहे. त्यामुळं दोन्ही क्षीरसागरांकडून नगर पालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

नगरसेवक डॉ.योगेश क्षीरसागर आणि त्यांच्या पत्नी डॉ.सारिका क्षीरसागर गल्लोगल्ली मतदारांच्या थेट गाठी-भेटी घेत आहेत. संक्रांतीचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असो की शिवजयंती; दुकानाचे उद्घाटन असो की कार्यकर्त्यांचा वाढदिवस, प्रत्येक ठिकाणी डॉ. योगेश क्षीरसागर हजेरी लावून आता मैदानात ‘मी आलोय’ हा संदेश आमदार क्षीरसागर यांना देत आहेत.

तर, आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून निवडणुकीच्या (Election) अनुषंगाने कोट्यवधींच्या कामाची उद्घाटने सुरू आहेत. विशेष करून गाव खेळापेक्षा शहरात या विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाकाच आमदार संदीप शिरसागर यांनी लावला आहे. दरम्यान क्षीरसागर बंधूंच्या सिनेमातील डायलॉगबाजी आणि शायराना अंदाजातील गाण्यांमुळे, काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नगरपालिका निवडणुकीपूर्वीच, राजकारण तापल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात बीड नगरपालिका आणि शिरसागर बंधूंमधील हे राजकारण काय रंग घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यातील हिंगणे मळ्यात हाय टेन्शनची विद्युतवाहिनी तुटली

Prakash Ambedkar: शरद पवार, उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Video: 48 पैकी 49 जागाही Uddhav Thackeray जिंकून आणू शकतात! देवेंद्र फडणवीसांच्या विधान ऐकून एकच हास्यकल्लोळ

Akola Accident: देव तारी त्याला कोण मारी! ट्रक आणि कारचा भीषण अपघात; कारमधील सर्वजण सुखरुप

Devendra Fadnavis: भाजपने पूनम महाजन यांचे तिकीट का कापले? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT