जालना : मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात निर्बंध कमी केले जाणार असून परिस्थिती पाहून लागू असलेले छोटे-मोठे असे सर्वच निर्बंध (Corona Restrictions) 100 टक्के हटवण्यात येतील तसेच कोरोनाचे हे निर्बंध हटवावेत अशी मुख्यमंत्र्यांचीही इच्छा असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. मार्च महिन्यानंतरच राज्यात 100 टक्के अनलॉक केला जाणार असल्याची माहिती राज्याच्या टास्क फोर्सने दिली आहे.
हे देखील पहा :
सध्या राज्यात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कमी झालेली नाही असंही टास्क फोर्सने स्पष्ट केलंय. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली. कोरोनाच्या (Corona) अनुषंगाने राज्य सरकारने राज्यात लागू केलेले निर्बंध (Restrictions) राज्य सरकार आता कमी करू शकतं असं पत्र केंद्रानेच राज्याला पाठवलं असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिलीय. राज्यात लसीकरण बऱ्यापैकी झाले असून याचा परिणाम निर्बंध शिथिल करण्यावर होत आहे.
त्यामुळे मार्च महिन्यात आणखी निर्बंध शिथिल केले जातील आणि मुख्यमंत्र्यांची (Uddhav Thackeray) सुद्धा अशीच इच्छा आहे असंही आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटलंय. आता राज्यात कोणत्याही प्रकारचे कडक निर्बंध राहुल नसून सध्या काही प्रमाणात हॉटेल व्यवसाय, लग्न समारंभ, थिएटर तसेच ईतर निर्बंध परिस्थिती बघून 100 टक्के हटवण्यात येतील अशी माहितीही टोपे यांनी दिलीय.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.