Pankaja Munde and Dhananjay Munde  Saam TV
महाराष्ट्र

Pankaja Munde: जेवढी लीड मिळेल तेवढ्या किंमतीचे गिफ्ट हवं, लाडक्या बहिणीची धनंजय मुंडेंकडे मागणी

Pankaja Munde and Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्या प्रचारामध्ये त्यांच्या लाडक्या बहिणी देखील सहभागी झाल्या आहेत. पंकजा मुंडे, प्रितम मुंडे आणि येशू मुंडे सध्या धनंजय मुंडे यांच्या प्रसारामध्ये व्यस्त आहेत.

Priya More

विनोद जिरे, बीड

विधानसभा निवडणुकीच्या राच्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. बीडमधील परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहे. धनंजय मुंडे यांच्या प्रचारामध्ये त्यांच्या लाडक्या बहिणी देखील सहभागी झाल्या आहेत. पंकजा मुंडे, प्रितम मुंडे आणि येशू मुंडे सध्या धनंजय मुंडे यांच्या प्रसारामध्ये व्यस्त आहेत. परळी मतदारसंघातील उजनी पाटी येथे झालेल्या जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी लाडक्या भावाकडे वजनदार गिफ्टची मागणी केली आहे.

भावासाठी प्रचार करणाऱ्या पंकजा मुंडे यांनी आता धनंजय मुंडेंकडे वजनदार गिफ्टची मागणी केली आहे. 'तुम्हाला जेवढी लीड मिळेल, त्या लीडच्या संख्येला गुणवून जो आकडा येईल, त्या आकड्यासारखं वजनदार गिफ्ट मला द्या, मी देखील लाडकी बहीण आहे, तुमच्या विजयाची सभा याच उजनी पाटीवर हेलिकॉप्टरने येऊन घेऊ.', असं म्हणत पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत भाऊ धनंजय मुंडेंकडे गिफ्टची मागणी केली. त्यांच्या या मागणीची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले की, 'उजनी पाटी येथे आम्ही विजयाची सभा घेऊ त्यावेळी आम्ही हेलीकॉप्टरने येऊ. त्यावेळी धनुभाऊ हेलिकॉप्टर करतील आणि मी त्यात बसून येईल. मी पण लाडकी बहीण आहे. ते मला आणतील आणि मोठा आहेर सुद्धा करतील. मला, प्रितमला आणि येशूताईला मतदारसंघात प्रचार केल्याबद्दल गिफ्ट द्या.'

तसंच, 'मुंडेसाहेब मला म्हणाले होते निवडून आल्यावर तुला गिफ्ट देईल. मी म्हणाले होते जेव्हढी लीड येईल त्यावर शुन्य लावून मला तेव्हढे पैसे द्या. आता तुम्ही पण जी लिड येईल त्यापुढे मी जो गुणाकाराचा आकडा लावीन त्याच्यानंतर तशा रकमेचं काहीतरी घेवून चांगलं वजनदार गोष्ट इथे सगळ्यासमोर मला गिफ्ट म्हणून द्या.', अस म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंकडे गिफ्टची मागणी करत इथेच गुलाल उधळून विजयाची सभा घेऊ असे जाहीर सभेत सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 - Pranit More : 'बिग बॉस १९' चे घर गाजवणाऱ्या महाराष्ट्रीयन भाऊची संपत्ती किती?

Pranit More Struggle Journey : दादरची चाळ ते बिग बॉसचे घर कसा होता प्रणित मोरेचा संघर्षमय प्रवास? वाचा महाराष्ट्रीयन भाऊची कहाणी

SCROLL FOR NEXT