Shruti Vilas Kadam
हिवाळा किंवा फेस्टिव्हल सीझनमध्ये त्वचा थकलेली आणि डल दिसते, अशावेळी हा घरगुती फेस मास्क त्वचेला नॅचरल ग्लो देतो.
या मास्कमध्ये रासायनिक घटक नसल्याने सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सुरक्षित आहे.
२ चमचे बेसन, १ चमचा हळद, १ चमचा चंदन पावडर, २ चमचे दही, १ चमचा मध आणि काही थेंब गुलाब पाणी.
सर्व घटक एका भांड्यात नीट मिसळून पेस्ट तयार करा.
चेहरा स्वच्छ धुऊन ही पेस्ट हलक्या हाताने संपूर्ण चेहऱ्यावर लावा.
१० ते १५ मिनिटांनी कोमट पाण्याने धुऊन घ्या त्वचा मऊ, तजेलदार आणि स्वच्छ दिसेल.
वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा आणि आठवड्यातून दोनदा हा मास्क वापरल्यास नैसर्गिक ग्लो टिकून राहतो.