Major Setback for Sharad Pawar Faction in Beed Saam
महाराष्ट्र

सख्खे भाऊ पक्के विरोधक! ऐन निवडणुकीत आमदाराच्या भावानं साथ सोडली, भाजपचं कमळ हाती घेणार

Major Setback for Sharad Pawar Faction in Beed: बीड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि आमदार संदीप क्षीरसागर यांचे भाऊ हेमंत क्षीरसागर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती.

Bhagyashree Kamble

  • बीडमध्ये क्षीरसागर घराण्यातील सख्ख्या भावांमध्ये राजकीय फूट.

  • हेमंत क्षीरसागर यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित.

  • शरद पवार गटाला मोठा धक्का.

तब्बल ९ वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. महायुती तसेच महाआघाडीतील नेत्यांनी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश पक्षनेतृत्वाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित पक्षातील नेत्यांना दिले आहेत. दरम्यान, काही ठिकाणी मतभेद होत असल्याने महाआघाडी किंवा महायुतीत फूट पडली असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच बीडमध्ये भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला धक्का बसला आहे.

बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे सख्खे बंधू हेमंत क्षीरसागर यांनी भाजपचं कमळ हाती घेण्याचं निश्चित केलं आहे. या पक्षप्रवेशाबाबत त्यांनी स्पष्टता दिली आहे. बीड नगर परिषदेमध्ये क्षीरसागर यांचं कायम वर्चस्व पाहायला मिळालं आहे. राजकीय जीवनात हेमंत क्षीरसागर यांनी त्यांचे बंधू संदीप क्षीरसागर यांची साथ दिली आहे.

मात्र, आता सख्खा भाऊ पक्का विरोधक बनणार आहे, तसेच भावाविरोधात राजकीय मैदानात उभा राहणार आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची साथ सोडून आमदार संदीप क्षीरसागर यांनी वेगळी भूमिका घेतली होती. आता यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांचे सख्खे बंधू माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी पक्षाची साथ सोडली. तसेच भाजपसोबत जाणार असल्याचं निश्चित केलं आहे.

दरम्यान, बीडमध्ये सख्खा बंधू भावाविरोधात मैदानात उतरल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संदीप क्षीरसागर यांचे बंधू हेमंत क्षीरसागर यांच्याकडूनच राजकीय आव्हान मिळणार असल्याचं सध्या चित्र दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPGला स्वदेशी DMEचा पर्याय, गॅसच्या आत्मनिर्भरतेसाठी NCLचा प्रयोग

Maharashtra Live News Update : खामगाव तालुक्यातील रामनगर गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून दोन गटात तणाव

बीड पुन्हा हादरलं! घरातून उचलून विवाहित महिलेवर अत्याचार, नंतर चावडीवर बांधलं

भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर, 73 वर्षीय ज्येष्ठ नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Lawrence Bishnoi Gang Threat: 'अगली बार सीधे माथे में गोली मारेंगे'…; गायक बादशाहला जीवे मारण्याची धमकी

SCROLL FOR NEXT