Beed News Saam TV
महाराष्ट्र

Beed Political News : बीडचं राजकीय समीकरण बदलणार? धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांचा पक्षाला रामराम; राज्यातील राजकारणाला कंटाळून निर्णय

Political NEws : एकीकडे आनंदीआनंद असताना धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक पक्ष सोडून गेल्याने चिंता वाढली आहे.

विनोद जिरे

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत धनंजय मुंडे यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. या बंडाबाबत बक्षिस म्हणून त्यांना राज्याची कृषिमंत्रीपदही मिळालं. मात्र एकीकडे आनंदीआनंद असताना धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक पक्ष सोडून गेल्याने चिंता वाढली आहे.

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभापतींसह शेकडो कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. बीडच्या गेवराईमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. (Latest Marathi News)

बीआरएसचे खासदार बी.बी पाटील यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकवर्तीय बाळासाहेब मस्के, मयुरी खेडकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. (Political News)

राज्यातील अभद्र युती आणि आघाडीला कंटाळून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भारत राष्ट्र समितीमधे प्रवेश केल्याचं त्यांनी म्हटलं. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात भारत राष्ट्र समितीची घोडदौड जोरात सुरु असल्याने येत्या काळात जिल्हाचं राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ई-केवायसी करूनही लाडकींचे पैसे अकडलेत? ₹१५०० कधीपासून मिळणार? सरकारने दिली महत्वाची अपडेट

CM थलपती विजय दिल्लीत, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra News Live Update: जलजीवन मिशनमधील गैरव्यवहारावर मेहकर पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन

हार्बर मार्गावरून लवकरच धावणार जलद लोकल; कसा असेल संपूर्ण प्रकल्प? महत्त्वाची माहिती समोर

प्रसिद्ध दिग्दर्शकानं घराच्या छतावरून उडी मारून जीवन संपवलं; पोलिसांना सापडली सुसाईड नोट

SCROLL FOR NEXT