Five Arrested in Assault Case Involving BJPs Balraje Pawar Saam
महाराष्ट्र

मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याच्या भावाला अटक, मारहाण प्रकरण भोवलं

Five Arrested in Assault Case Involving BJPs Balraje Pawar: बीडच्या गेवराई मतदानाच्या दिवशी मारहाण व गोंधळ प्रकरण. बाळराजे पवार यांना अटक. पवारांसह पाच जणांनाही ठोकल्या बेड्या.

Bhagyashree Kamble

बीडच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. गेवराई मतदारसंघात नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी झालेल्या मारहाण आणि गोंधळप्रकरणी भाजपाचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे भाऊ बाळराजे पवार यांना अटक करण्यात आली आहे.  बाळराजे पवार यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दोन डिसेंबर रोजी बीडच्या गेवराईत नगरपरिषद मतदान प्रक्रिया पार पडली होती. यावेळी पवार आणि पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. दरम्यान, या गोंधळात माजी आमदार अमरसिंग पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या मारहाणप्रकरणात भाजप नेते बाळराजे पवार यांच्यासह पाच जणांना अटक.

या घटनेनंतर गेवराई पोलीस ठाण्यात पोलिसांनी स्वत:हून सुमोटो दखल घेत तब्बल ५० जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. संबंधित आरोपींना नोटिसा बजावण्यात आल्याची देखील माहिती आहे. मात्र, बाळराजे पवार यांच्यावर गुन्ह्याची वाढ झाल्याने त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेनंतर गेवराईतील राजकीय वातावरण तापले असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात आणखी काय कारवाई होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

SCROLL FOR NEXT