Beed Crime Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime : मला कार घ्यायचीय, १० लाख दे! बीडमध्ये पोलीस अधिकाऱ्याने केला पत्नीचा छळ, परिसरात खळबळ

Beed News : बीडमध्ये पोलीस अधिकाऱ्याने पैशांसाठी पत्नीचा छळ करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीने पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Yash Shirke

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

बीडमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने दहा लाख रुपयांसाठी पत्नीचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनीच हुंड्यासाठी पैसे मागितल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पुण्यात वैष्णवी हगवणे या विवाहितेला हुंड्यासाठी मारहाण झाली होती. लग्नात ५१ तोळे सोने, महागडी कार, चांदीच्या वस्तू अशा अनेक गोष्टी हुंडा म्हणून देण्यात आला होता. पण तरीही वैष्णवीला हुंड्यासाठी त्रास देण्यात आला होता. सासरी होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. हे प्रकरण ताजे असताना बीडमध्ये हुंड्यासाठी बायकोचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील पिंपळनेर पोलीस ठाण्यात विनोद सखाराम कुटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विनोद यांची पत्नी रेणुकाने पती आणि सासरच्या मंडळींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. चारचाकी कार घेण्यासाठी पती विनोद कुटे दहा रुपयांची मागणी करत होते. पैशांसाठी शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

रेणुका कुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बीड पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी विनोद सखाराम कुटे, सीता सखाराम कुटे, रोहिणी गोविंद गाडे आणि गोविंद बाबासाहेब गाडे या चौघांच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दहा लाख रुपयांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप या चारही जणांवर करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT