संस्था चालकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकांनी सुरू केले अन्नत्याग आंदोलन ! विनोद जिरे
महाराष्ट्र

संस्था चालकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकांनी सुरू केले अन्नत्याग आंदोलन !

संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना, संस्थाचालक आणि मुख्याध्यापक वेळचे वेळी वेतन करत नाहीत. तसेच इतर लाभ दिले जात नाहीत. असा आरोप करत संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्या जाचाला कंटाळून, शिक्षकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

विनोद जिरे

बीड : लॉकडाऊनच्या कालावधीत गेल्या 7 महिन्या पासून वेतन न मिळाल्यामुळे, आश्रम शाळेच्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या बीड कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पाटोदा तालुक्यातील वडझरी येथील, संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना, संस्थाचालक आणि मुख्याध्यापक वेळचे वेळी वेतन करत नाहीत. तसेच इतर लाभ दिले जात नाहीत. असा आरोप करत संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्या जाचाला कंटाळून, शिक्षकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

हे देखील पहा -

बोगस विद्यार्थ्यांमुळे गाजलेल्या या आश्रम शाळेतील शिक्षकांची होणारी पिळवणूक थांबवावी. यासाठी शिक्षकांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे साकडे घालत, मंत्रिमहोदय आम्हाला न्याय द्या. अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे संत शिरोमणी भगवान प्राथमिक आश्रम शाळेत बोगस विद्यार्थी आणि बोगस शिक्षक भरती या प्रकरणात प्रशासक नेमण्यात यावा. यासाठी वारंवार विभागीय पातळीवरून सचिवांपर्यंत कारवाईचे आदेश आले.

मात्र कारवाई केली गेली नाही. म्हणून प्रशासक नियुक्त करून शासनाची होणारी फसवणूक ही थांबवावी. अशी मागणी या शिक्षकांनी केली आहे. यामुळे पुन्हा एकदा सामाजिक नेते धनंजय मुंडे यांचा जिल्ह्यात शिक्षकावर संस्थाचालकाकडून होणारा अन्याय समोर आला आहे. अशा संस्थाचालकावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar: 'असे चित्रपट कधी कधी...'; धुरंधर चित्रपटाच्या वादावर प्रसिद्ध अभिनेत्याची प्रतिक्रिया

समृद्धी महामार्गावर भयंकर अपघात, भाविकांच्या पीकअपला कारची धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Detox Drink : सकाळी उठल्यावर प्या हे हेल्दी कोथिंबीर लिंबूचे डिटॉक्स ड्रिंक

Maharashtra Live News Update: नाशिक शहरातील मध्यवर्ती भागात बिबट्याचा मुक्त संचार

Gold Price: सोन्याला चकाकी! १० तोळे सोनं १९,१०० रुपयांनी महागलं; २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT