Beed Crime X
महाराष्ट्र

Beed Crime : तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू...! बीडमध्ये पुन्हा गुंडाराज, परळीत मारहाण झालेल्या तरुणाने सांगितली आपबिती

Beed News : बीडच्या परळीमध्ये एका तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली. या तरुणावर अंबाजोगाईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मारहाण करणाऱ्यांपैकी सातजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Yash Shirke

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

बीडमधील परळीत काल (१६ मे) शिवराज दिवटे या तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली. लाठ्या, काठ्या आणि हत्यारांनी तरुणाला मारहाण झाल्याची माहिती समोर आली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मारहाण प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सात जणांना अटक केली असून जखमी शिवराजवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शिवराज दिवटेने त्याच्यासोबत काय घडले याची माहिती दिली. 'मी माझ्या मित्रांसह अखंड हरिनाम सप्ताहाला गेलो होता. त्या ठिकाणी काही लोकांचे भांडण झाले होते. मला त्या संदर्भात काहीच माहिती नव्हती. त्यानंतर मी माझ्या गावी जाण्यासाठी निघालो. रस्त्यात आमच्या दुचाकीला चार ते पाच जणांनी अडवले आणि दुसऱ्या दुचाकीवर बसवून रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात घेऊन गेले', असे शिवराज म्हणाला.

'रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेल्यानंतर त्यांनी मला लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. मारहाण करताना ते याचा संतोष देशमुख पार्ट टू करु असे म्हणत होते. काही लोक माझ्या मदतीला आले. त्यांच्या तावडीतून मला सोडवले नसते, तर त्या पोरांनी मला जिवंत सोडले नसते. त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी', असे म्हणत शिवराज दिवटेने घडलेला प्रसंग सांगितला.

शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. हे लोक वाल्मीक कराडच्या गँगशी संबंधित असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर अंजली दमानिया यांनी देखील भाष्य केले आहे. शिवराज दिवटेच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR filing: ITR भरण्यासाठी उरले २४ तास; फक्त १० मिनिटांत घरबसल्या रिटर्न भरा, वाचा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Maharashtra News Live Update: ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले

Railway Accident : नागपुरात भयंकर दुर्घटना! रेल्वे रुळावर २ भावांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले; नेमके काय घडले?

ठाण्याच्या विकासाला नवी झळाळी! सिद्धेश्वर तलावाजवळील ५० एकरांहून अधिक क्षेत्रात उभारणार ‘ग्रेड A+’ व्यावसायिक प्रकल्प

पंढरपूरच्या वारीवरून परतताना काळाचा घाला! ३ वाहनांचा भीषण अपघात; एका वारकऱ्याचा मृत्यू, ११ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT