Former NCP Leader Booked for Black Magic During Parli Procession Saam TV News
महाराष्ट्र

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Saptashrungi Temple News: परळीत देवी मिरवणुकीदरम्यान माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी कोंबड्याचा बळी देत जादूटोण्याचा अघोरी प्रकार केल्याचा आरोप; गुन्हा दाखल, तपास सुरू.

Bhagyashree Kamble

बीडच्या परळी गावात सप्तश्रृंगी देवीच्या मूर्तीस्थापनेच्या मिरवणुकीदरम्यान अंधश्रद्धेचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माजी नगराध्यक्षांनी रस्त्याच्या मधोमध कोंबड्याचा बळी दिला.तसेच त्याच्यावर नागलीची पाने, हळद, कुंकू आणि लिंबू टाकून जादूटोणा करण्याचा प्रकार केला, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी माजी नगरध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

परळी गावात सप्तश्रृंगी देवीच्या मूर्तीस्थापनेची मिरवणूक निघाली होती. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरध्यक्ष दीपक देशमुख यांनी रस्त्याच्या मधोमध अघोरी कृत्य केलंय. त्यांनी कोंबड्याचा बळी दिला. नंतर त्याच्यावर नागलीची पाने, हळद, कुंकू आणि लिंबू टाकून जादूटोणा करण्याचा प्रकार केला.

माजी नगरध्यक्षांनी जादूटोणा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बालाजी ढगे यांनी केला. त्यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली. या घटनेनंतर परिसरात अंधश्रद्धेला खतपाणी मिळालं, तसेच लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय, असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केला.

ही घटना सप्तश्रृंगी देवीच्या धार्मिक मिरवणुकीदरम्यान घडल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी दीपक देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. दीपक देशमुख यांनी जादूटोण्याचा प्रकार का केला? मध्यरस्त्यावर कोंबड्याचा बळी देण्यामागचं कारण काय? याचाही तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs WI : नितीश रेड्डी, केएल की यशस्वी.. कुणाचा झेल सर्वोत्कृष्ट? तिन्ही व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा

Blouse Fitting Hacks: फक्त 2 मिनिटात करा ब्लाउज फिटींग; वापरा 'या' ५ सुपर ट्रिक्स

IND vs WI: अहमदाबाद कसोटीत भारताचा मोठा विजय; सिराज-जडेजासमोर विंडीजने नांगी टाकली

Anganwadi Bharti: खुशखबर! अंगणवाडीत सर्वात मोठी भरती; ६९००० पदे भरली जाणार; वाचा सविस्तर

Saam Impact : अकोल्यातील 'स्कायमेट वेदर स्टेशन' घोटाळा प्रकरणी सरकार अ‍ॅक्शन मोडवर, काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT