PARLI COLLEGE EMPLOYEE ABDUCTED AND BRUTALLY ASSAULTED OVER MONEY DISPUTE Saam Tv
महाराष्ट्र

Beed : बीडमध्ये नामंकित कॉलेजच्या कर्मचाऱ्याचे अपहरण, निर्जनस्थळी नेत बेदम मारहाण

Beed Parali Crime News : बीड जिल्ह्यातील परळी येथे महिला महाविद्यालयातील एका कर्मचाऱ्याचे घरातून अपहरण करून निर्जन ठिकाणी नेऊन अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिघांविरोधात गुन्हा दाखल.

Alisha Khedekar

  • बीडच्या परळीतील धक्कादायक घटना

  • महिला महाविद्यालयातील लिपिक अनिल पत्की यांचे घरातून अपहरण

  • अपहरणानंतर निर्जन ठिकाणी नेऊन मारहाण केली

  • याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Beed Parali Crime News बीड जिल्ह्यातील परळी शहरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. महिला महाविद्यालयातील एका कर्मचाऱ्याचे राहत्या घरातून अपहरण करून त्याला निर्जन ठिकाणी नेऊन अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात आरोपीसह दोन अज्ञात साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल बाबुराव पत्की हे परळी येथील महिला महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे आरोपी वैजनाथ यादव याच्यासोबत मागील काही वर्षांपासून पैशांचे व्यवहार सुरू होते. या व्यवहारातूनच हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ९ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास वैजनाथ यादव हा अनिल पत्की यांच्या घरी आला. आर्थिक व्यवहाराबाबत चर्चा करण्याच्या बहाण्याने त्याने पत्की यांना आपल्या दुचाकीवर बसवून कॉलेज रोड, काळरात्री मंदिर परिसर आणि धारावती भागाकडे नेले. त्यानंतर नदीपलीकडील एका निर्जन ठिकाणी गाडी थांबवण्यात आली.

यावेळी तेथे आरोपीचे आणखी दोन अज्ञात साथीदार मोटारसायकलवरून आले. तिघांनी मिळून पत्की यांच्याकडे पैशांची मागणी करत शिवीगाळ सुरू केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी लाकडी काठी आणि बेल्टने त्यांच्या पाठीवर, डोक्यावर आणि पायांवर बेदम मारहाण केली. तसेच या घटनेची माहिती कोणाला दिली किंवा पोलिसांत तक्रार केली तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकीही दिली.

मारहाणीनंतर आरोपींनी अनिल पत्की यांना दुपारपर्यंत डांबून ठेवले. त्यानंतर त्यांना सोडून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घाबरलेल्या अवस्थेत पत्की यांनी ही घटना आपल्या नातेवाईकांना सांगितली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात उपचार घेतले आणि परळी शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून अपहरण, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध घेण्यासह पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषद निवडणूकीत रेश्मा काळे यांच्या बंडखोरीमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली!

Pune Crime: खून, दरोडा आणि चोरी! तब्बल ११९ गुन्हे दाखल असलेल्या गुंडासह तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, उधळला दरोड्याचा कट

त्वचेमध्ये दिसणाऱ्या 'या' 5 बदलांकडे कधीही दुर्लक्ष करू नका

India vs Afghanistan: हार्दिक पंड्या OUT, कोणत्या खेळाडूची होणार एन्ट्री? पाहा अफगाणिस्ताविरूद्ध्या वनडेसाठी कशी असेल प्लेईंग ११

Gold Rate Today : सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचा भाव काय ? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

SCROLL FOR NEXT