Pargaon Mother and son beaten  Saam TV News
महाराष्ट्र

शेतात काम करताना लेकाला मारलं, मुलाची न्याहारी नेताना आईला मारहाण; बीडमध्ये नेमकं चाललंय काय?

Beed Pargaon mother and Son Beaten : बीडच्या शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथील कृष्णा दादासाहेब घोडके (वय २७) हा तरुण शेतात काम करत असताना अचानक त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

Prashant Patil

बीड : जुन्या वादाची कुरापत काढून आई आणि मुलाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बीडचा घाटशीळ पारगाव येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणात गंभीर जखमी असलेल्या रुग्णावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीमुळे संपूर्ण अंगावर वळ उमटले आहेत. त्यामुळे किती अमानुष मारहाण केली आहे हे दिसून येत आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शिरूर पोलीस ठाण्यात सुरू आहे. आता या घटनेनं खळबळ उडाली असून आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलं आहे.

बीडच्या शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथील कृष्णा दादासाहेब घोडके (वय २७) हा तरुण शेतात काम करत असताना अचानक त्याच्यावर हल्ला करण्यात आला. तसेच कृष्णा याची आई संजीवनी दादासाहेब घोडके (वय ५०) या शेतात भाकरी घेऊन येत असताना त्यांनाही मारहाण करण्यात आली. नातेवाईकांनीच जुना राग डोक्यात ठेवून आठ ते दहा जणांनी मारहाण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur : महापालिकेच्या बनावट शिक्क्यांचा वापर, बोगस कागदपत्राने जमिनी लाटल्या, काँग्रेसचा भाजप नेत्यावर आरोप

Gold Price Today: सोनं-चांदीच्या दराने गाठला नवा उच्चांक, १ तोळा सोनं दीड लाखांजवळ; तुमच्या शहरातील आजचे दर किती?

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट होणार? आठव्या वेतन आयोगाबाबत नवीन अपडेट

BB Marathi 6 -Prabhu Shelke : प्रभू शेळके 'या' गंभीर आजाराने ग्रस्त, बिग बॉसच्या घरात सर्वकाही सांगितलं

Maharashtra Live News Update : मकरसंक्रांतीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीची तुळशी व पाद्यपुजा बंद राहणार

SCROLL FOR NEXT