Parali News Saam tv
महाराष्ट्र

Parali News : पंकजा मुंडेंना धक्का, धनंजय मुंडेंसमोर नवं आव्हान, मित्रपक्षाच्या नेत्यानं फुकंली तुतारी, परळीचं राजकारण तापणार!

विनोद जिरे

बीड : मुंडे बहिण-  भाऊ एक झाले आणि आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. असं म्हणत रासपचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पंकजा मुंडे यांना धक्का तर धनंजय मुंडे यांच्या समोर नवे आव्हान असणार आहे. तर प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर परळीत बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे.

बीडच्या (Beed) परळीमध्ये राजकारणात घडामोडी घडत आहेत. रासप गटाचे व पंकजा मुंडे यांच्या सोबत राहणारे राजाभाऊ फड हे राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत. याबाबतचे त्यांनी बॅनर देखील लावले आहेत. यामुळे परळीतील राजकारण तापणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान फड म्हणाले, की मुंडे भाऊ- बहिण वेगळे होते. त्यावेळी नक्कीच पंकजा मुंडे यांच्यासोबत होतो.  मागचे १५ वर्षे जानकर साहेबांच्या पक्षात काम केले. यामुळे जानकर यांच्यासमोर हा विषय ठेवला असता त्यांनी काहीही प्रत्युत्तर दिले नाही. परळीतील (Parali News) माझी वाटचाल ही धनंजय मुंडे यांच्या विरोधात आहे; असे म्हणत राजाभाऊ फड यांनी आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करताना कोणतीही अट मी ठेवलेली नसल्याचे देखील राजाभाऊ फड यांनी स्पष्ट केले आहे.

उद्या मुंबईत करणार प्रवेश 
रासपचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड हे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मुंबई येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. राजाभाऊ फड हे रासपचे युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. काही निवडणुका त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत राहत प्रचार देखील केला होता. परंतु आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजाभाऊ फड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: दादांच्या एक्झिटसाठी भाजप-सेनेचा प्लॅन? विधानसभेत अजित पवारांना एकटं लढावं लागणार? वाचा...

Jalna News : जरांगेंच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती आली समोर

Maharashtra News Live Updates: परभणी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची हजेरी

India : देशातील 5 सर्वात उंच इमारती माहिती आहेत? आकाश वाटेल ठेंगणे

Rain News : राज्यात पावसाचा अलर्ट; कुठे होणार सर्वाधिक पाऊस ?

SCROLL FOR NEXT